सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | अयोध्या येथे सोमवारी (दि. २२) रोजी मोठ्या उत्साहात रामल्ललाची प्रति प्राणप्रतिष्ठा झाली. ह्या सोहळ्या निमित्ताने नाशिक येथील काळाराम मंदिरात माळवाडी (ता. देवळा) येथील दावल भदाणे यांनी सपत्नीक ५१ मांड्यांचा (पुरण पोळीचा) नैवेद्य पोहच केला.
अयोध्या येथे रामल्ललाची प्रति प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात झाली. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात गावागावात याची पूर्वतयारी करण्यात आली होती. राम मंदिरांची साफसफाई, रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सडा रोंगोळी काढून, गुढ्या उभारून एक प्रकारे दिवाळी साजरी झाली.
Deola | केदा आहेरांमुळे पहिल्यांदाच देवळ्याला शेतकरी संघाच्या नेतृत्वाची संधी
शोभा यात्रा, विद्यार्थ्यांनी केलीली वेशभूषा यावेळी लक्षणीय ठरली. याप्रसंगी महिलांची उपस्थित लक्षणीय ठरली. उपस्थित राम भक्तांना महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. सायंकाळी गावागावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
माळवाडी (ता. देवळा) येथील राम केटरचे संचालक दावल भदाणे यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमासाठी मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांकडे ५१ पुरणपोळीचा नैवेद्य यावेळी सपत्नीक सुपूर्त केला. या सामाजिक बांधिलकीचे भदाणे कुटूंबियांचे देवळा शहर व तालुक्यातुन सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम