देवळा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

0
42
देवळा महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ महेंद्र शिंदे व्यासपीठावर प्राचार्य हितेंद्र आहेर आदी

द पॉईंट नाऊ ; देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवार दिनांक 24 रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रा.तुषार वाघ यांनी केले.

देवळा महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ महेंद्र शिंदे व्यासपीठावर प्राचार्य हितेंद्र आहेर आदी

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, एम जे एम महाविद्यालय करंजाळी ता.पेठ यांनी कल्पनारम्य आणि वस्तुस्थिती या विषयावर उत्कृष्ट व्याख्यान दिले व त्याचबरोबर सरांनी कल्पनाशक्ती मुळे लागलेले शोध यावर अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला व विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारांना चालना देण्याचे काम केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्य डॉ.ए बी पवार, डॉ.व्ही एम जोशी व डॉ.डि के आहेर आदि प्राध्यापक वर्ग व सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्रशासकीय विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रमाचे आभार प्रा.महेश वळवी यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here