Namco Bank | सोहनलाल भंडारी तिसऱ्यांदा ‘नामको’च्या अध्यक्षपदी विराजमान

0
22
Namco Bank
Namco Bank

Namco Bank |  उत्तर महाराष्ट्र तसेच नशिक जिल्ह्याची आर्थिक जीवनवाहिणी असलेल्या ‘नाशिक मर्चन्ट्स को. आॅप बँक’ च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी, हे तब्बल तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. तर, बँकेच्या उपाध्यक्षपदी रंजन ठाकरे आणि जनसंपर्क संचालकपदी अशोक सोनजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानुसार, आता  निवडीने सोहनलाल भंडारी यांना तिस-यांदा या पदाचा मान मिळाला असून, रंजन ठाकरे पहिल्यांदाच उपाध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत.(Namco Bank)

काल नवनिर्वाचित संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली नामको बँकेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे पार पडली. दरम्यान, या बैठकीत बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया ही यावेळी पार पडली.(Namco Bank)

NAMCO Bank | नामकोत ‘प्रगती’ची जीप सुसाट; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त

तिसऱ्यांदा भंडारी अध्यक्ष पदी (Namco Bank)

अध्यक्षपदासाठी सोहनलाल भंडारी आणि उपाध्यक्ष या पदासाठी रंजन ठाकरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ज्येष्ठ संचालक आणि विद्यमान अध्यक्ष सोहनलाल भंडारी हे यापूर्वी सन २००६ मध्ये सहा महिने अध्यक्ष होते. यानंतर सन २०१९ मध्ये ते पुन्हा तब्बल सव्वा वर्षे अध्यक्षपदावर कार्यरत होते. त्यानंतर आता तिस-यांदा सोहनलाल भंडारी यांना हा मान मिळाला आहे. (Namco Bank)

दरम्यान, यावेळी आयोजित अभिनंदनाच्या सभेत बोलताना मावळते अध्यक्ष वसंत गिते म्हणाले की, “यंदा बँकेचे डिपॉझिट पाच हजार कोटींचे उद्दिष्ट असून, कुठलाही डाग न लावता नामको बँकेचे कामकाज हे प्रभावीपणे सुरू आहे. तसेच, पुढील काळातही नेत्रदीपक प्रगती करणारी नामको ही एकमेव बँक असेल. यावेळी याठिकाणी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर, तसेच माजी आमदार जयंत जाधव, हे उपस्थित होते.(Namco Bank)

NAMCO Bank | नामको बँक निवडणूक निकाल; ‘हे’ पॅनल आघाडीवर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here