इम्रान खानची कबुली : पाकिस्तान खरंच भिकारी

0
68

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खानने (Imran Khan) देश दिवाळखोर झाला असल्याचे शेवटी मान्य केले आहे. देश चालवण्यासाठी पैसे नसल्यामुळे दुसऱ्या देशांकडून कर्ज घेऊन कामकाज करावे लागत असल्याचे इमरान खान (Imran Khan) यांनी स्पष्ट केले. मंगळवारी एका कार्यक्रमात इमरान खान म्हणाले की, देशात कराच्या माध्यमातून मिळणारा महसूल कमी झाला आहे. यामुळे विदेशांकडे झोळी फैलावी लागत आहे. सरकारकडे लोककल्याणकारी कार्यक्रमासाठी पैसा नाही. त्यामुळे आम्हाला आता मागून खाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या देशांवर अवलंबून कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने आम्ही कंगाल झालो आहोत अशी खातीरजाम कबुली त्यांनी दिली आहे.

फेडरल बोर्ड ऑफ रिव्हेन्यू (FBR) च्या ट्रॅक ऍण्ड ट्रेस सिस्टम (TTS) चे उद्घाटन कार्यक्रमात इमरान खान (Imran Khan) म्हणाले, ‘आमच्या देशातील सर्वात मोठी समस्या देश चालवण्यासाठी पैसा नाही. यामुळे कर्ज घ्यावे लागते. जनताची कर देण्याची प्रवृत्ती नाही. TTS प्रणाली तंबाकू, साखर व सीमेंट सह अन्य महत्वपूर्ण क्षेत्रातील उत्पादन व विक्रीवर देखरेख ठेवले. यामुळे देशातील महसूल वाढण्याची अपेक्षा आहे. जर नागरिकांनी प्रामाणिकपणे करांचा भरणा केला तर देश अजूनही दिवाळखोरीतून बाहेर येऊ शकतो, असे इमरान म्हणाले.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयवर अनेकदा लष्कर-ए-तैयबासह विविध दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१६ च्या ढाका हल्ल्यानंतर लगेचच बांगलादेश सरकारला आढळले की जेएमबीचे दहशतवादी लष्करी प्रशिक्षणासाठी पाकिस्तान आणि नंतर अफगाणिस्तानात गेले होते. रिपोर्टनुसार, बांगलादेशमध्ये जेएमबी आणि अतिरेकी पसरवण्यात लष्कर-ए-तैयबाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पैसा नसल्याने पाकिस्तान अश्या संघटनांना मदत करते आणि चालवते. २०१६ च्या ढाका हल्ल्यानंतर लगेचच बांगलादेश सरकारला आढळले की जेएमबीचे दहशतवादी लष्करी प्रशिक्षणासाठी पाकिस्तान आणि नंतर अफगाणिस्तानात गेले होते.

भारताला लक्ष्य केले जाऊ शकते
AMM रोहिंग्या निर्वासित शिबिरांमधील तरुणांची भरती करत आहे आणि त्यांना बांगलादेश आणि भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. लष्कर, जेएमबी, एएमएम यांच्यात एक दशकाहून अधिक काळ मजबूत संबंध आहे. बांगलादेशातील तरुणांना शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवले जाते. २०१२ मध्ये, बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी मौलाना शाबीर अहमदला पकडले, जो बांगलादेशमध्ये रोहिंग्या दहशतवाद्यांसोबत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या वतीने काम करत होता. अहवालात म्हटले आहे की बांगलादेशस्थित एएमएम हरकत-उल-जिहाद इस्लामी-अरकानमधून उद्भवला आहे, ज्याचे लष्कर आणि पाकिस्तानी तालिबानशी संबंध आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here