Manoj Jarange: आयच यडपट बुजगावण कुठल…; जरांगेनी भुजबळांची अब्रूच काढली

0
49
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange: मराठा आरक्षणासंदर्भात बीडमध्ये सुमारे 100 एकर जागेत मनोज जरांगे यांची आज सभा सुरू आहे. या सभेत जरांगे यांनी सुरवातीलाच भुजबळ यांच्यावर टीकेचे आसूड ओढले आहेत. एकदा आरक्षण मिळू दे मग तुझ्याकडे बघतोच अशा शब्दात त्यांनी एकप्रकारे दमच भुजबळ यांना भरला आहे. यावेळी बोलतांना जरांगे भुजबळांना उद्देशून म्हणाले की मी या महताऱ्याला सोडून दिले होते मात्र याची वळवळ थांबत नाही, याला बघतोच भविष्यात असा इशारा देखील दिला आहे. सरकारी शिष्टमंडळाने सलग दोन दिवस जरांगे यांची भेट घेऊन फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितला.  आज जरंगे आपली पुढील रणनीती स्पष्ट करणार आहेत.  यासाठी बीड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून 1800 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सभेसाठी शेकडो मराठा नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसही दिली आहे.

 मराठा कार्यकर्त्याचा दावा

 मराठा आरक्षणाची लढाई 80 टक्के जिंकली असून आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात असल्याचे आरक्षणाची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी दावा केला. जरांगे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारकडे मागणी पूर्ण करण्यासाठी फक्त आजचा दिवस उरला आहे. मराठवाड्यातील आजच्या सभेला संबोधित करताना जरंगे यांनी लोकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे तसेच सावधगिरी बाळगण्यास आवाहन केले.

काय म्हणाले मनोज जरांगे ?

जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची वेळ आली आहे. जरांगे म्हणाले, “80 टक्के लढाई जिंकली आहे.” आपला लढा आता अंतिम टप्प्यात आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांनी या वर्षी दोनदा बेमुदत उपोषण केले होते.  ते म्हणाले की, सरकारला या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 40 दिवसांचा अवधी देण्यात आला होता, मात्र काहीही झाले नाही.  त्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. (Manoj Jarange)

जरांगे इशारा सभा | आश्वासनं खूप झालीत आता…; इशारा सभेत जरांगेची तोफ काडाडणार

मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाला डाग लावण्यात आला आहे, कुणी म्हणतंय आमची घरं जाळली, तर कुणी म्हटलं हॉटेल जाळली मात्र मी सांगतो हे आपल्यावर खोटे आरोप करण्य़ात आले. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले, आहेत तो समाज कुणाची घरं कशाला पेटवेल हो ? यांच्या लोकांनी हॉटेलं आणि घर जाळली अन् नाव मराठा समाजावर गेलं. सरकारही यांचं ऐकतं पण आता मराठा समाज जागा झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कसं आणायचं ते बघाच.” असे जरांगे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here