काय सांगता! आता कळवण मध्येही?

0
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ;  नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळवण (Kalwan) मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सध्या कारवाईचा मोठ्या प्रमाणावर धडाका लावला आहे.

ज्या अंतर्गत आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवण मध्ये देखील धडक कारवाई करत सुमारे 80 लाखांहून अधिक चे मद्य (Alcohol) जप्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्या भरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने, दुसऱ्यांदा कारवाई करत अवैध (Illegal) मद्याचा पडदा फाश केला आहे.

या आधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक शहरातील त्र्यंबक रोड (Tryambak Road) वर अवैध मद्याचा साठा जप्त केला होता.

ज्यात सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

आता नाशिक जिल्ह्यातल्याच कळवण तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई करत, पुन्हा अवैध आणि बंदी असलेला मद्य साठा जप्त केला आहे.

या जप्त केलेल्या मद्य साठ्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य सापडले आहे.

नाशिक जिल्ह्यात ही दुसऱ्यांदा अवैध मद्य साठा सापडण्याची कारवाई करण्यात आली आहे.

कळवण मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागा द्वारे करण्यात आलेल्या या कारवाईत एका जनास अटक ही करण्यात आली आहे.

या गोष्टींमुळे नाशिक जिल्ह्यात अवैध मद्य साठ्याचे रॅकेट तर नाही ना? अशी शंका देखील उपस्थित केली जातेय.

नाशिक जिल्ह्यातल्या या दुसऱ्या कारवाई ने मद्य प्रेमींनी आता सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

अशा प्रकारे अवैध मद्य साठा सापडल्याने, चिंता व्यक्त होतेय.

मद्य प्रेमींनी आपण प्राशन करत असलेले मद्य अवैध आणि बंदी असलेले तर नाही ना? याची खात्री करणे गरजेचे आहे.

मद्य प्रेमींमध्ये इंपोर्टेड अर्थात विदेशी मद्याची मोठी क्रेझ असते. आणि त्याचाच फायदा घेऊन अशा प्रकारे, या मद्य तस्करांद्वारे अवैध विदेशी मद्याची तस्करी केली जाते आहे.

ही बातमी वाचलीत का?

‘एक सर्व सामान्य माणूस (Common Man) हा अनेक दिवस सोशल मीडियावर (Social Media) महिलेचा (Ladies) पाठलाग करण्यात, क्रीडा संघाकडून (Sports Team) अपेक्षा ठेवण्यात आणि आपली स्वप्न (Dreams) काळजी नसलेल्या राजकारण्यांच्या (Politicians) हातात सोपवण्यात घालवतो!’

हे वाक्य सोशल मीडियावर महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) कंपनीचे चेअरमन (Chairman) आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या नावाने व्हायरल करण्यात आले.

पुढील माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

बापरे! हे काय बोलून गेले आनंद महिंद्रा?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here