आज संपूर्ण जगामध्ये फार्मसी क्षेत्र हे तिसरे मोठे जागतिक क्षेत्र आहे. फार्मसी हा आरोग्य सेवा उद्योगाचा अविभाज्य भाग आहे. करोनाकाळात औषधनिर्माणशास्त्र क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे तयार करणे, वितरीत करणे हा औषधनिर्माणशास्त्राचा भाग आहे. आज या क्षेत्रात फार्मासिस्टच्या संधी वाढत आहेत. औषधविक्रेत्या पासून औषध उत्पादन क्षेत्रात औषधांचे उत्पादन व औषधांची सुरक्षितता वाढताना दिसत आहे.
औषधनिर्माण क्षेत्रात मोठ्या संधी
आज बाजारपेठेत रोज नवनवीन औषधे येत आहेत. औषधाच्या अनेक कंपन्या भारतात आपले जाळे विस्तारत आहेत, अशा वेळी त्यांना सर्वात जास्त गरज असते ती फार्मासिस्टची. फार्मासिस्ट म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर औषधांच्या दुकानात काम करणारा माणूस येतो, पण हे क्षेत्र फक्त एवढ्यापुरतेच सीमित नाही. याचा विस्तार बराच मोठा आहे, आज याचे आपण स्वरूप पाहूया. फार्मसी ही आरोग्यविज्ञान संबंधित शाखा आहे. औषधांसंबंधी संशोधन करणे, कोणते औषध कसे बनवले जावे, औषधाचे प्रमाण किती असावे, औषध कशा पद्धतीने दिले जावे, औषधांचे इफेक्ट आणि साइड इफेक्ट याचा अभ्यास करणे हे फार्मासिस्टचे काम आहे. औषधांच्या दर्जाची तपासणी (क्वालिटी कंट्रोल) करणे. औषधे बनविण्यासाठी संबंधित कायद्यांचा आणि योग्य पद्धतींचा अवलंब करून विविध प्रक्रियांचा शोध घेणे. एक उत्तम फार्मासिस्ट बनण्यासाठी लाइफ सायन्सची आवड असणे आवश्यक आहे. तर्क शुद्ध आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता, उत्तम संवाद कौशल्य गरजेचे आहे.
अभ्यासक्रम
अ.नं. अभ्यासक्रम शैक्षणिक आर्हता कालावधी
१ डी. फार्म. १०+२ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ गणित) २ वर्ष
२. बी. फार्म. प्रथम वर्ष बी. फार्म.- १०+२ विज्ञान शाखेतून किमान ४५ % खुला प्रवर्ग व राखीव प्रवर्गासाठी ४०% गुणांनी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ गणित)
द्वितीय वर्ष बी. फार्म.- डी. फार्म. किमान ५० % (खुला प्रवर्ग)४५ % (राखीव प्रवर्ग) गुणांनी उत्तीर्ण ४ वर्ष
३ वर्ष
3 बी. फार्म.
( फार्मसी प्रक्टिस) डी. फार्म. किमान ५० % गुणांनी उत्तीर्ण व ४ वर्ष औषधनिर्माण क्षेत्रातील अनुभव २ वर्ष
४.
फार्म. डी. १०+२ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण किमान ५०% खुला प्रवर्ग व
राखीव प्रवर्गासाठी ४५ % गुणांनी उत्तीर्ण. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ गणित) शिक्षण व १ वर्ष रुग्णालयात प्रशिक्षण
५ फार्म डी.
(पोस्ट बेक लॉरिअट ) बी. फार्म किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण ३ वर्ष ( २ वर्ष महाविद्यालयीन शिक्षण व १ वर्ष रुग्णालयात प्रशिक्षण )
६ एम. फार्म विविध विद्यापीठातील नियमानुसार (पुणे विद्यापीठानुसार बी. फार्म किमान ५५% खुला प्रवर्ग व राखीव प्रवर्गासाठी ५०% किंवा राज्य सरकारची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण) २ वर्ष
७ पी. एच. डी.
एम. फार्म किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण ३ ते ४ वर्ष
सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण ३६ पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये असून त्यात सुमारे २१६० जागा आहेत. तर ३० पदवी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये असून त्यात सुमारे २३६० जागा आहेत. व पदवीत्तर औषधनिर्माणशास्त्राच्या १३ महाविद्यालये असून त्यात ३७९ जागा आहेत.
रोजगारसंधी
करोनाकाळात फार्मसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाल्या आहेत. या कालावधीत केंद्र सरकारच्या विविध विभागांतर्फे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. शासकीय विभाग जसे प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी इस्पितळ, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड वेलफेअर, पेस्ट कंट्रोल, डिव्हिजन ऑफ अॅरग्रिकल्चर, डिपार्टमेंट ऑफ नॅशनल डिफेन्स, प्रिव्हेंशिअल रिसर्च कौन्सिल, इनव्हार्यमेंटल डिपार्टमेंट, विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक, औषधे बनविणा-या कंपनीमध्ये, औषधांचे दुकान (मेडिकल फार्मसी), मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह, फूड आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्येही फार्मासिस्टना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याचबरोबर डेटा सायन्स, क्लिनिकल रायटिंग अशा विविध क्षेत्रात मोठ्या संधी आहेतच शिवाय परदेशात ‘फार्मसी इकोनॉमिक्स’ या क्षेत्रातील संधीही खूप मोठ्या आहेत. यामुळे सध्या या क्षेत्रात सुरुवातीला देण्यात येणारे वेतनही चांगले दिले जाते. तसेच पुढील दोन वर्षांत उत्तम काम करणाऱ्याला उत्तम संधीही मिळते. स्वयंरोजगार (स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये रजिस्टर झाल्यावर), तुम्हाला स्वत:चे औषधांचे दुकान सुरू करता येते. यामुळे विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे वाढत आहे.
फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र)
शासकीय विभाग खाजगी विभाग स्वयंरोजगार उच्च शिक्षण
केंद्र सरकारी रुग्णालय राज्य सरकार रुग्णालय -मेडीकल -मेडीकल स्वतचे -बी.फार्म
-रेल्वे -सिविल हॉस्पिटल -क्लिनिकल रायटिंग -डीस्ट्रीब्युटर्स -फार्म.डी.
-संरक्षण विभाग -प्राथमिक आरोग्य केंद्र -डेटा सायन्स -होलसेलर – एम. फार्म
– महानगरपालिका रुग्णालय -अनालेटीकल केमिस्ट -उद्योजक -एम.बी.ए.
-प्रोडक्शन ऑफिसर -पी.एच.डी.
-लॅब टेकनिशियन
-स्टोर कीपर
करोना काळात “आरोग्य हेच जीवन आहे” याची प्रचिती आपल्या सर्वानाच आलेली आहे. त्यामुळे या नजीकच्या काळात औषधनिर्माणशास्त्र हे क्षेत्र करिअर बनविण्यासाठी एक गुरुकिल्लीच ठरू शकते. म्हणचेच एकंदरीत औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात करिअर च्या संधी चढी असून ती प्रचंड वेगाने वाढत आहे. म्हणूनच औषधनिर्माणशास्त्र हे क्षेत्र करिअर बनविण्यासाठी एक सुवर्णसंधीच आहे.
प्रा. सौ. उर्मिला गवळी
के. के. वाघ इंस्टीट्युट ऑफ फार्मसी,
चांदोरी,ता. निफाड,जि. नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम