Malegaon | मालेगाव (Malegaon) तालुक्याचे माजी आमदार रशीद शेख यांचे सोमवार (दि. ४ डिसेंबर ) रोजी रात्री निधन झाले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांची जीवनज्योत मवळली. वयाच्या ६५ वया वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या अलीकडेच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना मालेगावच्या एका रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आलेले होते. पण, त्रास वाढल्यानंतर पुढे त्यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
स्वभावाने हसतमुख, आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा ते आमदार राहिलेले होते. १९९९ मध्ये रशीद यांनी मालेगावमधून २५ वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव करून त्यांना पराभवाचा मोठा धक्का दिला होता.
तसेच, मालेगाव (Malegaon) महानगर पालिकेच्या महापौर पदाची देखील धुरा त्यांनी सांभाळलेली होती. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस ह्या पक्षात प्रवेश केला होता. ते याआधी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, पक्षसंघटना तसेच कार्यकर्त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ह्या सातत्याने वाढतच होत्या. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रशीद शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली होती.
Administration | तुकाराम मुंडेंच्या इतक्या बदल्या; यात नेमकी कोणाची चूक..?
आज ११ वाजता दफन विधी
२०१७ मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले होते. तत्पूर्वी १९९४ मध्ये ते नगराध्यक्ष होते. यापूर्वीही तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात त्यांच्यावर राज्यमंत्री पद तसेच दर्जाचे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदाची दूर सोपविण्यात आली होते.
त्यांची अंत्ययात्रा ही कै.खलील दादा यांचे घर, गल्ली नं. एक हजार खोली येथून निघणार आहे. तर, आयेशा नगर, कब्रस्तान येथे आज सकाळी ११ वाजता त्यांचा दफन विधी होणार आहे. समंजस तसेच समन्वयी नेतृत्व हरपल्याची भावना मतदार संघातून व्यक्त होत आहे. दरम्यान, राशिद शेख यांच्या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. (Malegaon)
सोनिया गांधी यांचे विश्वासू
राशीद शेख यांचा काँग्रेसला रामराम हा राज्यातील आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात होता. माजी आमदार रशीद शेख व त्यांच्या आई महापौर ताहिरा शेख तसेच त्यांच्यासह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते मानले जात होते. एवढच नाहीतर, रशीद शेख हे सोनिया गांधी यांचे विश्वासू व निकटवर्तीय देखील मानले जात होते. पण, या संपर्ण कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठे यश आले होते.(Malegaon)
Agriculture | सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना दिलासा; असा आहे दर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम