Crime News | आधी मित्राला दारू पाजली; नंतर त्यालाच दगडानं ठेचून संपवलं

0
23

Crime News | मुंबईतील कांदिवली पूर्व येथे आढळलेल्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या मित्राला अटक केली असून आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. परंतु या प्रेमसंबंधात मृत व्यक्ती अडसर ठरत होता. त्यामुळे आरोपीने मित्राला दारु पाजून दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Crime News)

Nashik News | नाशकात कठोर कारवाईस सुरवात; प्रशासन ऍक्शन मोडवर  

 

योगेश कांबळे (वय, ३४) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कांदिवली पूर्व येथे दामू नगर परिसरात एका निर्जनस्थळी योगेशचा मृतदेह आढळून आला तेव्हा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र पोलिसांना घटनास्थळी त्याच्या डोक्याला जखम होईल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. यामुळे योगेशची हत्या करून पुरावे नष्ट करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली असता घटनेच्या दिवशी योगेश आणि त्याचा मित्र रविंद्र गिरी (वय, ३४) यांनी सोबत दारू पिली असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

 

या माहितीच्या आधारे पोलिसांनी गिरीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानेच योगेशची हत्या केल्याची कबूली दिली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी रवींद्र गिरीला तात्काळ अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. आता याप्रकरणी पुढील अधिक तपास सुरू आहे. (Crime News)

Crime News | अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला वारंवार अत्याचार

आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते मात्र योगेश हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. यामुळे आरोपीने योगेशला मारण्याचा कट रचला होता. सुरुवातीला आरोपीने योगशला खूप दारू पाजली आणि त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घातला. यातच कोणालाही संशय येऊ नये म्हणून हत्येत वापरलेला दगड बॅगेत भरुन घेऊन गेल्याचे आरोपीने म्हटले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here