शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार तरी कधी?

0
14

द पॉईंट नाऊ ब्युरो ;  आंदोलक शेतकरी वर्गाने आता अजून एक पेच केंद्र सरकार समोर उभा केला आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या नवीन सहा मागण्या केंद्र सरकार समोर ठेवल्या आहेत.

शेतकरी वर्ग मागील बऱ्याच काळापासून आंदोलन करत आहे. त्यात बऱ्याच शेतकरी वर्गाचा बळी गेला.

त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी कायदे रद्द केले. मात्र आता त्यानंतर देखील अद्याप आंदोलक शेतकरी वर्गाने आपले आंदोलन मागे घेतलेले नाही.

आंदोलक शेतकरी वर्गाने आता आपल्या सहा मागण्या केंद्र सरकार समोर ठेवल्या आहेत.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना अटक करण्यात यावी, एम. एस. पी. बाबत कायदा बनवण्यात यावा, आंदोलक शेतकरी वर्गावर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

संयुक्त किसान मोर्चा द्वारे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

मागील बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे देशातील वातावरण पूर्णतः तापलेले आहे. आणि ढवळून निघाले आहे.

यात आंदोलन दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्यात लखीमपूर येथे झालेला हिंसाचारात काहींचा बळी गेला. काही राजकीय मंडळींनी शेतकऱ्यांना थेट अयोग्य शब्द वापरले.

यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण तापले. आणि शेतकरी वर्गाचे हे आंदोलन अधिक चिघळले.

त्यामुळे अद्याप पर्यंत या आंदोलनाचा काही निकाल लागला नव्हता. त्या नंतर केंद्र सरकारने एक पाऊल मागे टाकत, तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय घोषित केला.

केंद्र सरकारच्या या निर्णया नंतर सगळीकडे आनंद साजरा केला गेला. हा शेतकऱ्यांचा विजय आहे, म्हणून सर्वांना हायसे वाटले. बऱ्याच जणांनी केंद्र सरकारवर टीका केली.

मात्र आता संयुक्त किसान मोर्चाने नवीन सहा मागण्या केंद्र सरकार समोर ठेऊन, आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय.

त्यामुळे आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

ही बातमी आपण वाचलीत का?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

वास्तविक, 28% डीए वाढीनंतर पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना 3% वाढीव डीएसह एकूण 31 टक्के महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच नोव्हेंबरचा पगार वाढणार आहे.

पुढील माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचा फराळ


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here