Mlg: मंत्री भुसेंच्या संकल्पनेतून रंगणार कीर्तन सोहळा; नव वर्षाचे आध्यात्मिक ‘गिफ्ट’

0
30

Mlg: कीर्तनाच्या माध्यमातून समाजात परिवर्तनाची लाट निर्माण होत असते. मार्ग भरकटलेल्या समाजाला दिशा देण्याचे कार्य नेहमीच वारकरी सांप्रदायाचे राहिले आहे, इ.स. १२व्या शतकापासून वारकरी संप्रदायाने संत साहित्याच्या आणि संत परंपरेच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्राला विचारांचे धन दिले. याच विचारांनी सामाजिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. हीच परंपरा कायम राखत मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून मालेगाव तालुक्यात फिरता कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे.  या महोत्सवाचे आयोजन 31 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. (Mlg)

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामरायांचे आगमन, विश्वसंत श्री निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी जयंती महोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज ३५१ वा राज्याभिषेक पूर्णाहुती सोहळ्या निमित्त मालेगाव तालुका फिरता कीर्तन महोत्सव पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी आयोजन समितीने नियोजनास सुरवात केली असून नागरिकांच्या दारी अध्यात्माचा तसेच वारकरी संप्रदायाचे धन घेवून जात असल्याची प्रतिक्रिया आयोजन समितीच्या वतीने दिली आहे. (Mlg)

Nashik | नाशिकमध्ये यावर्षी ‘रेकॉर्ड ब्रेक’ खुनाच्या घटना

शेकडो वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हिन्दु धर्मीयांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामरायांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोध्येत संपन्न होत आहे. त्या आनंदप्रित्यर्थ वै. सदगुरु जोगमहाराज, वै. सदगुरु मास्तबाबा खायदेकर, वै. सदगुरु कृष्णाजी माऊली जायखेडा, वै. सदगुरु हरीबाबा आचेगांवकर, वै. सदगुरु लक्ष्मणतात्या वळवाडेकर, यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने मालेगाव तालुक्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाने आणि वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणाऱ्या पालकमंत्री मा. ना. दादाभाऊ भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून तालुक्यात फिरता कीर्तन महोत्सव आयोजीत केला आहे. वारकरी सांप्रदायातील तत्वनिष्ठ आणि सांप्रदायिक परंपरेचे पाईक यात मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं आव्हान करण्यात आलेलं आहे.

कसा असेल हा महोत्सव? 

३१/१२/२०२३ – सौंदाणे : सायंकाळी ८ ते १० – ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले (पंढरपुर) मृदंग सेवा : ह.भ.प. हेमंत महाराज (वडनेर)

०१/०१/२०२४ – झोडगे : सायंकाळी ६ ते ८ – ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) ह.भ.प. सचिन महाराज (करंजगव्हाण)
०२/०१/२०२४ – दाभाडी : सायंकाळी ८ ते १० – ह.भ.प. श्री. उद्धव महाराज मंडलिक (नेवासा) ह.भ.प. विजय महाराज (वडेल)
०३/०१/२०२४ – करंजगव्हाण : सायंकाळी ८ ते १० – हभप श्री. संजय महाराज पाचपोर गुरुवर्य (बुलढाणा) ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (कंधाणे)
०४/०१/२०२४ – वडनेर : सायंकाळी ८ ते १० – ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज पाटील जळगांव (जळकेकर) ह.भ.प. कृष्णा महाराज (मालेगाव)
०५/०१/२०२४ – रावळगाव : सायंकाळी ८ ते १० – ह.भ.प. श्री. कान्होबा महाराज देहूकर (संत तुकोबाराय वंशज) ह.भ.प. विजय महाराज (वळवाडी)
०६/०१/२०२४ – वडेल : सायंकाळी ८ ते १० -ह.भ.प. श्री. उमेश महाराज दशरथे (वारकरी भूषण आळंदी) ह.भ.प. मयूर महाराज (खाकुर्डी) (Mlg)

Crime News | मद्यधुंद प्रेमीयुगलाने भररस्त्यात घातला राडा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here