द पॉईंट प्रतिनिधी : भारतात नागरिकांना आता कोरोनाशी लढण्यासाठी अजून एक शस्त्र मिळाले आहे. केंद्र शासनाद्वारे जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन च्या लसीचा एकच डोस पुरेसा असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन च्या लसीला मिळालेली परवानगी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे.
भारतात सध्या कोविशील्ड, कोव्हक्सीन, स्फुटनिक या लसी दिल्या जात आहेत. त्याअंतर्गत आत्तापर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या स्पष्टीकरणानुसार ५० कोटीचे लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. आणि त्यात आता जॉन्सन अँड जॉन्सन ची लस देखील देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, लसीकरणाला मोठे पाठबळ मिळणार आहे.
तसेच जॉन्सन अँड जॉन्सन च्या लसीचा एकच डोस पुरेसा असल्याचे सांगितले जात असल्याने, लसीकरण अजून वेगात होण्यास मदत होईल.
अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपणीद्वारे देण्यात आलेल्या त्यांच्या लसीच्या आपत्कालीन वापराच्या निवेदनाला केंद्र सरकारने परवानगी दिल्याने, लसीकरण मोहीम नक्कीच अधिक वेगवान होईल यात शंका नाही. जॉन्सन अँड जॉन्सन ची ही लस ८५% प्रभावी असल्याचे बोलले जात आहे. तसेच या लसीचा एकच डोस पुरेसा असल्याने कमी वेळात अधिक नागरिकांचे लसीकरण होण्यास मदत मिळणार आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन ची ही लस कोरोनाच्या काही व्हेरिएंट वर प्रभावी असली, तरी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट वर ही लस किती प्रभावी आहे? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
कोरोनाच्या संसर्गाने जगभरात मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्यानंतर, जगभरातील देशांमध्ये कोरोनावर प्रभावी लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झाले होते. त्यात भारत, अमेरिका, चीन, रशिया सर्वच देश लसीच्या शोधामध्ये मेहनत घेत होते. त्यानंतर लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण देखील युद्धपातळीवर सुरू झाले.
भारतात सध्या १८+ वयोगटातील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. आणि जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही भारतात राबवली जाते आहे. जॉन्सन अँड जॉन्सन च्या लसीच्या वापराने भारतातील लसीकरण मोहीम अजून बळकट होण्यास मदत होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम