द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: अनेक विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासासाठी 20 ते 25 रुपये खर्च करणेही शक्य नसते. त्यामुळे एसटी प्रवासासाठी विद्यार्थ्यांना सवलत मिळते.
मात्र दिवाळीच्या सुट्टीच्या वादा नंतर अखेर बहुतांश शाळा सुरू होत आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास प्रश्न पडले आहेत.
कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन लेक्चर घेतले जात होते. ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवी पासूनचे प्रत्यक्ष वर्ग ऑफलाइन सुरू करण्यात आले.
मात्र त्यानंतर सहामाही परीक्षा आणि नंतर दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळा बंद झाल्या. राज्यातील बहुतांश शाळेतील वर्ग सोमवारपासून नियमित सुरू होणार आहेत, असं सांगण्यात आले.
मात्र ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयीसुविधा नसल्याकारणाने विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागते. ग्रामीण भागातील ग्रामस्थांची परिस्थिती जास्त प्रमाणात चांगली नसल्यानं त्यांना प्रवासाचे जास्त पैसे भरता येत नाही.
एसटी बस ही या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र एसटी संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि त्यामुळेच शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे असे सांगण्यात आले आहे.
आणि या सर्व कारणांवरून प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतोय, त्यामुळेच खाजगी वाहन चालक प्रवाशांना चांगलेच लुटत आहेत.
ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती दिसून आली आहे. एसटी संपामुळे शाळांच्या बसेसही बंद असल्याने शाळेत विद्यार्थ्यांना जाता येत नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम