Nashik | नाशिक विभागातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाअभावी एक महिन्याहून अधिक कालावधीचा ‘ड्राय स्पेल’ गेल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. या ‘ड्राय स्पेल’ (कोरड्या हवामानाचा दीर्घ कालावधी) चा मोठा फटका नाशिक विभागातील लाल कांद्याच्या लागवडीला बसला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरीप, लेट खरीप आणि रब्बी कांदा मिळून लागवडीच्या क्षेत्रात तब्बल 46.04 टक्के अशी मोठ्या प्रमाणात घट आली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालेले आहे.
Weather Update | थंडी कमी होणार पण पिकांवर दुष्परिणाम वाढणार..?
विशेष म्हणजे नाशिक विभाग लाल कांद्याचे आगार म्हणून ओळखला जात असतो. 2022-23 या वर्षी नाशिक विभागात खरीप 40 हजार 604 हेक्टर, लेट खरीप 57 हजार 917 हेक्टर, तर रब्बी 2 लाख 48 हजार 418 हेक्टर अशा एकूण 3 लाख 46 हजार 939 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झालेली होती. या कांदा लागवडीच्या तुलनेत 2023-24 या वर्षी नाशिक विभागात खरीप कांद्याची अवघ्या 19 हजार 919 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. त्यामुळे या कांद्याचे लागवडीचे क्षेत्र तब्बल 51 टक्क्यांनी म्हणजेच 20 हजार 685 हेक्टर इतके घटले आहे.
महत्त्वाची निरीक्षणे काय?
- लेट खरीपाची लागवडदेखील 27 टक्क्यांनी अर्थात 15 हजार 652 हेक्टरने घटून अवघी 42 हजार 265 हेक्टर
- रब्बी कांदा लागवडीच्या क्षेत्रातही कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 49 टक्के इतकी मोठी घट अपेक्षित
- यंदा रब्बी कांदा लागवड 1 लाख 25 हजार हेक्टर इतकीच, 1 लाख 23 हजार 418 हेक्टर क्षेत्र घटले
- तीनही प्रकारच्या लाल कांद्याची 1 लाख 87 हजार 184 हेक्टर अर्थात 53.95 टक्के इतकी लागवड
- 1 लाख 59 हजार 755 हेक्टर अर्थात 46.04 टक्के इतकी लागवड कमी झाली
- उत्पादकतेवरही होणार परिणाम
Ahmednagar | मनोज जरांगेंबद्दल महिला सरंपचाकडून घाणेरडी कॉमेंट; गुन्हा दाखल
विभागाची कांदा लागवडक्षेत्र प्रगती कशी?
हंगाम—खरीप—लेट खरीप—रब्बी
२०२२-२३ :क्षेत्र हेक्टर—४०,६०४—५७,९१७—२,४८,४१८
२०२२-२३ उत्पादन (लाख मेट्रिक टन)—५.७७—१०.१९—५८.६३
२०२२-२३ उत्पादकता (मेट्रिक टन)—१४.२०—१७.५९—२३.६०
२०२३-२४ क्षेत्र हेक्टर—१९,९१९—४२,२६५—१,२५,०००
२०२३-२४ उत्पादन (लाख मेट्रिक टन)—२.५९—६.४५—२६.२५
२०२३-२४ उत्पादकता (मेट्रिक टन)—१२.९८—१५.२६—२१.००
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम