क्षणात संपलेल्या कुटुंबातील चिमुरड्याला ‘शिवनिश्चल’ ट्रस्ट चा मदतीचा हात

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दोन दिवसांपूर्वी शेतातून काम करून येत असणाऱ्या ‘शेतकरी कुटुंबाला’ मद्यधुंद चालकाने चिरडले, अन काही क्षणात संपूर्ण कुटुंब संपले, होत्याचे नव्हते झाले, घरातील कुटुंब संपले नवरा-बायको आणि दोन्ही मोठी मुलं जागीच ठार झालीत, कुटुंबात केवळ ‘आठ वर्षाचा’ चिमुकला संदीप उरला त्याच्या मनावर इतका आघात झालाय की त्याचे शब्द देखील फुटत नाही. मात्र त्याला आधार म्हणून त्याचे संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी यशवंत गोसावी यांच्या ‘शिवनिश्चल’ ट्रस्ट ने उचली.

या चिमुकल्याला आज भेटून त्याला प्राथमिक मदत सुपूर्द करून, त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ‘शिवनिश्चल’ ट्रस्ट ने घेतल्याची माहिती शिवव्याख्याते गोसावी यांनी दिली. दुःख मोठे आहे, पण पर्याय काहीच नाही…! असे म्हणत नागरिकांनी देखील मदत करावी त्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. (यशवंत गोसावी मो. 84 46 46 84 46 ) आपणही यात हातभार लावावा, फुल न फुलाची पाकळी म्हणून यात वाटा उचलावा. आज यंशवंत गोसावी यांनी या चिमुरड्याची भेट घेतली यावेळी, प्रा, डी के आहेर उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात आखे कुटुंब संपले आहे, हे दुःख न पेलणारे आहे, अगदी ऐकलं तरी अंगावर शहारे येतात, इतकी दुर्दैवी घटना ही या कुटुंबाच्या नशिबी आली आहे. वाहन चालवतांना काळजी घेणं किती महत्वाचे आहे, हे यातून शिकण्यासारखं आहे. आपल्या चुकीमुळे कुटुंब उद्धवस्त होऊ शकते याची जाणीव हवी. ज्या वंशांच्या पंतीने अजून जग हवं तसं बघितलं नव्हते तिच्या स्वप्नांना मार्ग दिसत असतांना, या युवतीला गगनभरारी घ्यायची असेल स्वप्न उराशी असतील मात्र या सर्व स्वप्नांची राख रांगोळी झाली. अन क्षणात होत्याच नव्हतं झालं.

‘द पॉईंट नाऊ’ या कुटुंबातील चिमुरड्याला मदतीचे आवाहन करत आहे. आपण ‘शिवनिश्चल’ ट्रस्ट कडे आपली मदत सुपूर्द करावी अथवा ‘द पॉईंट नाऊ’ च्या संपादकीय मंडळाशी संपर्क करून मदत घ्यावी हे माणुसकीच्या नात्याने आम्ही नम्र आवाहन करत आहोत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here