Nashik news | नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढतच असून, आता शहरात मस्ती करतो म्हणून एका पाच वर्षीय बालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, व हातावर गरम तवा ठेवत त्याला अमानुष वेदना दिल्याचा संतापजनक प्रकार घडलेला आहे.
धक्कादायक म्हणजे मुलाच्या मावशी व काकानेच हे कृत्य केले असून, चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी या दोषी दाम्पत्यांविरोधात पोलिसांकडे फिर्याद दिलेली आहे. शहरातील समतानगर या परिसरात शुक्रवारी दुपारी हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
आरती व विजय सदावर्ते असे ह्या दाम्पत्याचे नाव आहे. आगरटाकळी शिवारातील समतानगर येथील शैलेश पांडव या किराणा दुकानासमोर हे दाम्पत्य राहतात. तपास अधिकारी संतोष गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरती यांच्या बहिणीची अलीकडेच प्रसूती झाली असून,
Gold-Silver Price | सोन्याला पुन्हा अच्छे दिन!; पाहा आजचा भाव
तिचा पहिला मुलगाही लहान असून दोन्ही बाळांना सांभाळणे शक्य होणार नसल्याने, बहिणीच्या पाच वर्षीय मुलाला आरती ही स्वत:च्या घरी घेऊन आली होती. चार महिन्यांपासून ती या मुलाचा सांभाळ करत होती. हा मुलगा मस्ती करतो म्हणून शुक्रवारी (दि. १७) रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आरती आणि विजय यांनी त्या मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या तळहातावर गरम तव्याने चटकेही दिले.
या संतापजनक प्रकाराबाबत तेथील परिसरातील काही जागरूक नागरिकांनी चाइल्डलाइनला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेत माहितीबाबत खातरजमा केली होती.
संबंधित बालकाच्या हातावर चटके आढळून आल्याने चाइल्डलाइन सुपरवायझर सायली चौधरी यांनी उपनगर पोलिस ठाण्यात या दाम्पत्यांच्या विरोधात फिर्याद दिली असून, त्यानुसार या सदावर्ते दाम्पत्यावर अल्पवयीन मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राष्ट्रवादीने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके आहेत तरी कोण?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम