Crime news | चोरट्यांचा मोर्चा शेतांकडे! नामपूरला दुसऱ्यांदा वीजपंपाची चोरी

0
20

Crime news | नामपूर येथील साक्री रस्त्यालगतच असणाऱ्या वृषाल नेर यांच्या शेतातून दुसऱ्यांदा विहिरीत बसवलेली साडेसात अश्वशक्ती क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेली आहे.

जायखेडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेतीकडे वळविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे आता भर पडली आहे.

शहर आणि परिसरात वारंवार होणाऱ्या चोरींमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. दरम्यान, शहरातील चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामकाजाविषयीही नागरिकांमध्ये नाराजी आहे, दरम्यान, पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही येथील नागरिकांनी केली आहे.

देवळा | पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा; शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

तक्रारदार नेर यांचे साक्री रस्त्यालगत १ हेक्टर ६८ गुंठे इतके क्षेत्र आहे. सकाळी शेतात आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. जुलै महिन्यात वृषाल नेर यांची टेक्समो कंपनीची मोटर चोरी झाली होती. त्यानंतर चार महिन्यात पुन्हा याठिकाणी मोटर चोरीची घटना घडल्याने त्यांचे ३५ ते ४० हजारांचे नुकसान झाले.

यापूर्वी साक्री रस्त्यालगत शिवसेनेचे संभाजी सावंत, महेंद्र सावंत यांच्या शेतातून साडेसात अश्‍वशक्ती क्षमतेच्या मोटारी चोरीस गेल्या आहेत. यापूर्वी शेतातून शेतीपयोगी साहित्यही चोरीला जात असल्याने आता शेतकरी पुरते वैतागले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आता वेगाने सूत्र फिरवत,  चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here