Nashik News | फटाके फोडण्याच्या वादातून मित्रांनीच केला खून

0
28

Nashik News | नाशिकमध्ये फटाके फोडण्यामुळे उद्भवलेल्‍या वादातून मित्रांनीच युवकाचा खून केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे.

नाशिक मधील पाथर्डी गाव या परिसरात मंगळवार (दि .१४) रात्री दहाच्‍या दरम्यान घडलेल्‍या ह्या घटनेत मयत युवकाचे नाव हे गौरव तुकाराम आखाडे (वय ३१) असे आहे. दरम्‍यान, या घटनेमुळे पाथर्डीगाव परिसरात दहशतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.

Nashik News | बाळाला बाहेर नेल्यावरून जाब विचाराल्याने पत्नीचा खून

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पाथर्डीगाव परिसरातील स्वराज्य नगर या भागात (दि .१४) रात्री दहा वाजेच्‍या सुमारास इमारतीखाली गौरव आखाडे हा फटाके फोडत असताना, याच परिसरात राहणाऱ्या त्‍याच्‍याच मित्रांनी फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरुन वाद घालत कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केलेत व त्याला जबर जखमी केले.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या गौरवचा तेथेच मृत्‍यू झाला. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेतली. मयत गौरव यांच्‍या पत्नी सपना आखाडे यांच्‍या फिर्यादीवरुन याप्रकरणी खुनाचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांकडून केलेल्‍या या कृत्याबाबत शहरात सर्वत्र हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.

रेल्वेभरती | कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कसा करावा अर्ज?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here