Diwali 2023 | दिवाळी हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. घरे, दुकाने, कामाची जागा साफ करण्यापासून ते नवीन कपडे, दिवे व फटाक्यांच्या आतिषबाजीने डोळे दिपवणारा हा सण संपूर्ण देशाला उजळून टाकत असतो. दिवाळीचा दूसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवसाचे अनेक महत्त्व आहे.
सोने खरेदीचा शुभ काळ
धनत्रयोदशी किंवा धनतेरस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी येते. या दिवशी सोने खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात, घरी आणतात आणि त्यांची पूजा करतात. आज धनत्रयोदशी साजरी होणार आहे. या दिवशी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त दुपारी १२.३५ ते १०.५७ पर्यंत आहे.
Onion Market | कांदाप्रश्नी केंद्राचं वरातीमागून घोडं!
समुद्रमंथनातून माता लक्ष्मी प्रकट
हिंदू धर्मात मान्यतेनुसार, धनत्रयोदशी दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी संपत्तीची देवी समजली जाणारी माता लक्ष्मी देवी प्रकट झाली. म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन सोने-चांदी घरी आणते व घरात सुख-शांती नांदते.
गुंतवणुकीचा चांगला पर्याय
भारतात सोने खरेदी हा गुंतवणुकीचा नेहमीच चांगला पर्याय मानला जातो. हे आनंद, समृद्धी, पवित्रता तसेच आदर यांचे प्रतिक समजले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करून, भारतीय लोक केवळ गुंतवणूकच नाही तर, धार्मिक विश्वासांनुसार घरात चांगले भाग्य आणतात. वाईट काळात सोन्यामुळे लगेच चांगले पैसेही उभारता येऊ शकतात. यामुळे याकडे चांगली गुंतवणूक म्हणून पाहिली जाते.
सांस्कृतिक व सामाजिक ओळख
भारतात धनत्रयोदशीला खूप महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, या दिवशी सोने खरेदी केल्याने वाईट शक्ती तसेच नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते. अनेक कुटुंबे या दिवशी सोने-चांदी खरेदी करून आपल्या शेकडो वर्षांची परंपरा पाळत असतात.
Gold Silver Rate | धनत्रयोदशीला सोने-चांदी स्वस्त
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम