देवळा तालुक्यात चोरटे ‘वस्तीत’ वनविभाग ‘सुस्तीत’ ; चंदनाची झाडे चोरीला

0
165

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील दहिवड गावात रात्री मोठ्या प्रमाणात चोरी झाली असून यात चंदनाची झाडे रात्रीत गायब झाली आहेत. गट नंबर 943 ग्यानदेव दादाजी अहिरराव व गौतम पठाण महिरे गट नंबर 942/3 मोतीराम भिवा अहिरराव माकोन्या दहिवड ता देवळा जि नाशिक यांच्या बांधावरील चंदनाचे झाड शनिवार दि 20/11/2021 रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केलेलें आहे.

तालुक्यात वनविभाग अंतर्गत जंगलात होणारे अतिक्रमण तसेच अनेक गैरप्रकार घडत असतांना , अधिकाऱ्यांनी मात्र कानाडोळा केल्याचे चित्र आहे. यामुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी वनविभागाने वस्तीत येणे गरजेचे आहे. तेव्हाच या तस्करांना लगाम लागेल.

दहिवड परीसरात यापूर्वी ही अनेक चंदन झाडाच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. बाबत वन विभाग व प्रशासनाने दखल घेऊन चंदन चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून एखाद्या वेळेस सदरील चंदन चोर घरांवर डल्ला मारून दरोडे खोरीही करू शकतात. अशी भिती परीसरातून व्यक्त होत आहे. नागरिकांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचे मत प्रहारचे तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर यांनी व्यक्त केलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here