Big News | दगाफटका करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव असू शकतो; जरांगे पाटील यांनी केला गंभीर आरोप

0
24

Big News | जालन्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ‘इंटरनेट बंद केल्यावर लोकांचा रोष वाढणारच. आता आंदोलन खूप मोठं झालय. आरक्षण मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही. उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो” असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. तातडीने विधानसभेचं अधिवेशन बोलवा. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करा. हे सगळे निर्णय लवकरात लवकर घ्या’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Nashik Crime| निफाडमध्ये अवैध गौण खनिज उपसा सुरू; माफियांवर अधिकाऱ्यांचा आशिर्वाद..?

‘मी, माझा मराठा समाज आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही. समाजाला पूर्ण आरक्षणच हवं. अर्धवट आरक्षण नको. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. नेट बंद करण्याचा काही जणांनी प्रयत्नही केला. पण नेटपेक्षापण मराठा समाज हुशार झाला आहे. काल रात्रीच हजारो लोक महाराष्ट्रातून इथे येऊन बसले आहेत. अशी कामं करुन राज्यातील वातवरण दूषित करु नका. अर्धवट दिलेलं आरक्षण आम्ही घेणार नाही’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘काही कारस्थान दिसतंय का? आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न आहे का?  या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते मला उठवू शकत नाहीत. त्यांचा डाव 100 टक्के दिसुन येत आहे. आता आंदोलन खूप मोठं झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. उद्रेक आमच्याकडून होणार नाही. शांततेतच आंदोलन सुरु राहील. आरक्षण दिल्याशिवाय आंदोलन थांबवू शकत नाही’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण | मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश; ‘या’ आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी घोषणा

‘सर्वपक्षीय बैठकीबद्दल विचारण्यात आलं, त्यावर ते म्हणाले की, “सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची ही दुसरी वेळ आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण का देत नाही?आरक्षण देण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागणार आहे? हे स्पष्टीकरण गरजेचं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण का देत नाही?  हा माझा प्रश्न आहे. सरसकट आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आज संध्याकाळपासून पाणीपण बंद करणार’  अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here