मोदींचा मोठा निर्णय ; क्रीडा पुरस्कारावरून ‘राजीव गांधींचे’ नाव पुसले

0
20

क्रीडा प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराचं नाव बदलण्याची घोषणा केलीय. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने पूर्वी हा पुरस्कार दिला जात असे. आता ”मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार” असणार आहे. 30 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जातो.

नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केली आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्याबाबत देशातील नागरिकांकडून अनेक सूचना आल्या होत्या. लोकांच्या भावनांचा आदर ठेवून खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजपा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

देशाचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाने अपवादात्मक कामगिरी केली. हॉकीमध्ये आमच्या खेळाडूंनी जी इच्छाशक्ती दाखवली. ती भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते. त्यांनी भारताला सन्मान आणि अभिमान मिळवून दिला. त्यासाठी आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्याच्या नावावरुन ठेवणे योग्य आहे, असे मोदी यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान यांनी बोलतांना सांगितले की ‘महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी सदैव स्मरणात राहील’ऑलिम्पिकच्या महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले. मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित होत आहे. जिथे आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करत नवी उंची गाठतो, आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here