Nashik | जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघातून लढण्यास डॉ. राजश्री अहिरराव इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढवला असून या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आल्याचे बोललं जात आहे. राजीनामा मंजूर झाला की, भूमिका स्पष्ट करू असं डॉ. अहिरराव यांनी स्पष्ट केलं आहे.
Maharashtra News | शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करा; अब्दुल सत्तारांचे आदेश
डॉ. राजश्री अहिरराव गेली अनेक वर्षे महसूल विभागात कार्यरत आहेत. त्यांनी नाशिक तहसीलदारपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदारपदाची जबाबदारी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी डॉ. राजश्री अहिरराव यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी त्या वेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यानंतर सातत्याने त्यांनी देवळाली मतदारसंघातील लोकांशी संपर्क वाढेल, याची काळजी घेतली होती.
PSI Exam | पीएसआय पदासाठी रविवारी होणार लेखी परीक्षा
ग्रामीण भागातील रहिवासींना आवश्यक मदत करणे, सरकारी कार्यालयातील अडकलेली कामे मार्गी लावून देणे, त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देणे अशी मदत त्यांच्याकडून सातत्याने सुरू होती. मतदारसंघाची बांधणी आणि निवडणुकीची तयारी करता यावी, यासाठी नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याचा निर्णय डॉ. राजश्री अहिरराव यांनी घेतल्याचे बोललं जात आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महसूल आणि वनविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे राजीनामा पाठविलेला असून, तो मंजूर करावा अशी विनंती केलेली आहे.
मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिलेला आहे. राजकारणात सक्रिय होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. राजीनामा मंजूर झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करेन. – डॉ. राजश्री अहिरराव, तहसीलदार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम