द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; शहापूर – मोहिली -अघई येथील आत्मामालिक क्रिकेट अकॅडमी मध्ये नुकतेच अंध क्रिकेटपटूसाठी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर भरविण्यात आले होते.
अंध क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व आत्मामालिक क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या संघाचे एकूण १४ खेळाडूना अजय मुनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण घेऊन हा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाला. सदर पूर्व प्रशिक्षणसाठी अंध क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज चौधरी सचिव रमाकांत साटम, खजिनदार दादाभाऊ कुटे, प्रोजेक्ट मॅनेजर पंकज लालाजी आदि उपस्थित होते. तसेच यावेळी आत्मामालिक ध्यानपीठाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी खेळाडूना राष्ट्रीय स्तरावर(दिल्ली)येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक, खेळाडू यांना आत्मामालिक ध्यानपीठाच्या वतीने प्रशिक्षण शिबिरासाठी सहकार्य करण्यात आले तसेच यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम