74 लाखांहून अधिक व्हॉट्सॲप खाती बंद; भारतात Whatsapp ची कारवाई

0
23

Whatsapp | भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने ऑगस्ट 2023 मध्ये, भारतात 74 लाखांहून अधिक व्हॉट्सॲप खाती बंद केलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान नियम 2021 नुसार प्रकाशित झालेल्या मासिक अहवालात व्हॉट्सॲप कंपनीने ही संपुर्ण माहिती दिलेली आहे. या अहवालात 1 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंतची माहिती समाविष्ट आहेत. ‘मेटा’ मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ऑगस्टमध्ये माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार 74,20,748 खात्यांवर बंदी घातलेली आहे. यापैकी 35,06,905 खाती वापर करणाऱ्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वीच सक्रियपणे बॅन करण्यात आलेली आहेत.

Raj Thackrey | … तर टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरेंचा इशारा

या कारणांमुळे Whatsapp ने खाती केली बंद

भारतातील 50 कोटींहून अधिक वापर करणारे असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मला म्हणजेच Whatsapp ला ऑगस्टमध्ये विक्रमी 14,767 तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. यापैकी 71 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

Whatsapp च्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘IT नियम 2021 नुसार आम्ही ऑगस्ट 2023 महिन्यासाठी आमचा अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अहवालात, वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी व व्हॉट्सॲप​​​​​​​ने केलेल्या कारवाईचा तपशील देखील देण्यात आलेला आहे. आमच्या Whatsapp प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाला सामोरे जाण्यासाठी स्वतः व्हाटसॲप​​​​​​​द्वारे केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा तपशील देखील या अहवालात समाविष्ट आहे.

World Cup जिंकायचा टिम इंडियाचा चान्स वाढला..

WhatsApp ने आणली 3 नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये

इन्स्टंट मेसेजिंग ॲप​​​​​​​ Whatsapp ने नवीन सुरक्षा फीचर्स आणलेले आहेत. Whatsapp चा दावा आहे की, या नवीन फीचर्समुळे वापरकर्त्यांना आधीपेक्षा जास्त सुरक्षा व गोपनीयता(privacy) मिळेल. या वैशिष्ट्यांमध्ये अलर्ट, व्हायरससाठी बॅक एंड चेक आणि स्वयंचलित सुरक्षा कोड पडताळणी यांचा समावेश आहेत. यामुळे वापरकर्त्यांना व्हायरसमुळे होणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here