द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देशाचे माजी कृषिमंत्री म्हटले, की अनिल देशमुखांच्या त्रासाचा एक – एक मिनिट वसूल केला जाईल.
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. आणि त्यांना नुकतीच 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागील बऱ्याच काळापासून सुरू असलेले, वसुली प्रकरण अद्याप देखील निकाली निघाले नाही आहे.
या प्रकरणाची सुरुवात झाली ती निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पासून.
त्यानंतर मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लेटर बॉम्ब फोडत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुली प्रकरणाचे आरोप केले.
देशमुख हे कोरोनाच्या काळात सक्रिय राहून कार्य करत असताना, अचानक पणे 100 कोटींच्या वसुलीचे देशमुखांचे आदेश असल्याचा बॉम्ब परमबीरसिंह यांनी फोडला
यामुळे राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले. तेव्हा पासून CBI आणि ED अनिल देशमुख यांच्या मागे होते. ज्यात बऱ्याच वेळा अनिल देशमुख तसेच, त्यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकण्यात आले.
यावर बोलतांना, आता राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष यांनी अनिल देशमुखांच्या पाठीशी उभे राहत भाजप वर निशाणा साधला आहे.
देशमुखांच्या त्रासाचा एक – एक मिनिट वसूल केला जाऊन, बदला घेतला जाईल. सर्व गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत. असे पवारांनी म्हटल्याचं बोललं जातंय.
त्यामुळे प्रश्न असाही निर्माण होतोय की, जर पवारांना सर्व बाबी ठाऊक आहेत, तर ते आत्ता पर्यंत गप्प का होते? अचानक त्यांनी यावर का भाष्य केले?
त्यांना जर सारे ठाऊक आहे, तर सारं काही ते समोर का आणत नाहीत?
की शरद पवार देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय? असा देखील सवाल उपस्थित केला जातोय.
या प्रकरणातील माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना देखील फरार घोषित करण्यात आले आहे.
देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांच्या मागे अद्याप तपासणीचा ससेमिरा सुरू आहे.
शरद पवार यांनी या प्रकरणी बोलतांना, याबाबत वस्तुस्थिती आपल्याला ठाऊक असल्याचे म्हटले आहे. देशमुख पुन्हा एकदा सक्रिय होतील. असे पवार म्हणाले आहेत.
आता हे प्रकरण अजून किती दिवस चालणार? निकाल कधी लागणार? शरद पवारांच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काय? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम