देवळा नगरपंचायतीच्या वतीने “स्वच्छता ही सेवा” उपक्रम

0
77

देवळा नगरपंचायतीच्या वतीने रविवारी दि.१ रोजी स्वच्छता पंधरवडा दरम्यान “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रम आयोजित करून देवळा शहरातील दुर्गामाता मंदिर व श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथे स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमास नगराध्यक्षा . सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर गटनेते संभाजी आहेर , मनोज आहेर, करण आहेर ,कैलास पवार ,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार,किशोर आहेर, हर्षद भामरे तसेच देवळा नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस , देवळा शहरातील आयटीआय चे प्राचार्य एस.डी. तिदमे ,सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन मुख्याधिकारी शामकांत जाधव यांच्या देखरेखीत देवळा नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अभियंता सुयोग पाचपटील, लेखापरीक्षक नितीन भवर, शहर समन्वयक पुनम भामरे ,सुधाकर आहेर मुकादम राजेंद्र शिलावट यांनी केले .

देवळा महाविद्यालय ; स्वच्छतेमुळे निरोगी राहू शकतो – प्राचार्य हितेंद्र आहेर

देवळा महाविद्यालय , राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबविण्यात आली. छात्रसेनेचे प्रमुख लेफ्टनंट बादल लाड यांनी प्रस्ताविक केले . महाविद्यालयातील सर्व घटकांनी महाविद्यालय व महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता केली. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर उपस्थित होते.

परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असून परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. यात शुद्ध हवा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, मानवी म्ल्मुत्रांची विल्हेवाट, पाळीव प्राण्यांची देखभाल, घरातील स्वच्छता, शेण व कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाण्याची विल्हेवाट.या सर्व गोष्टींचा समावेश करता येईल . ७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी नाशिक कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; आमदार तहसीलदार यांना घेरणार
यावेळी उपप्राचार्य पी. एन. ठाकरे, छात्रसेनेचे प्रमुख लेफ्टनंट बादल लाड, डॉ. विलास वाहुळे, डॉ. एस.बी बनसोडे, डॉ. डॉ. जयमाला चंदात्रे , कार्यालयीन अधीक्षक दिनेश वाघमारे,प्रा.चंद्रकांत दाणी डॉ. राकेश घोडे, राष्ट्रीय छात्रसेनेचे व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आभार कॅडेट केजल पाटील यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here