स्वप्निल आहिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ता.१७ ; सटाणा येथील गेल्या अनेक दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी संप सुरू असून भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हाजी शेख व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया यांच्या आदेशाने सर्व रापम. कर्मचारी सटाणा यांना पाठिंबा पत्र देण्यात आले.
पाठिंबा पत्र देताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाल्मिक भाऊ केदारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हनिफ ( राजू) सय्यद, नाशिक जिल्हाध्यक्ष शिवाजी सोनवणे यांच्या हस्ते पाठिंबा पत्र देण्यात आले. रापम कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागाच्या तुलनेत सर्वात कमी पगार देऊन एस टी महामंडळ मधील सर्व कर्मचारी वर्गावर अन्याय होत आहे.
दिलेल्या पगारातून साध्या मूलभूत गरजा देखील आज रोजी पूर्ण करता येत नाहीत त्यामुळे एसटी कर्मचारी हा हवालदिल होऊन आत्महत्येसारखा मार्ग निवडताना आपल्याला दिसून येत आहे. आज पर्यंत कमीत कमी ३३ कर्मचारी लोकांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. याचा आकडा भविष्यात वाढू नये याची दखल शासनाने घ्यावी.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी – सवलती वेतन, भत्ते लागू करण्यात यावे याकरिता दिनांक ७/११/२०२१ पासून शांततेच्या मार्गाने बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मानवाधिकार परिषद संपूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देत आहोत. असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाल्मिक भाऊ केदारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
नाशिक जिल्हा महासचिव योगेश ह्याळिज, सटाणा तालुका अध्यक्ष अमित आहिरे, तालुका उपाध्यक्ष अशोक तिळवणकर, आबालाल पानपाटील, खलील शेख, अनवर मुल्ला, सचिन माळी, इत्यादी भारतीय मानवाधिकार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
I