Khalisthan: जम्मू काश्मीरला जावू नका; कॅनडाचे नागरिकांना आवाहन

0
14

Khalisthan: यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही पीएम ट्रूडो यांच्या आरोपांबद्दल चिंतित आहोत. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारताला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन करतो. शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप ट्रूडो यांनी सोमवारी केला होता.

खलिस्तान वादाबाबत कॅनडाच्या आरोपांवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरण्यात आल्याबद्दल जो बिडेन प्रशासन चिंतेत आहे. अमेरिकेने भारताला या प्रकरणाच्या तपासात कॅनडाला सहकार्य करण्यास सांगितले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही पंतप्रधान ट्रूडो यांच्या आरोपांबद्दल चिंतित आहोत. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारताला या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन करतो. (Khalisthan)

निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकार – पीएम ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताच्या सहभागाचा तपास पाहता कॅनडाच्या सरकारने कॅनडातील भारताच्या सर्वोच्च मुत्सद्याची हकालपट्टी केली होती. त्याच वेळी, भारत सरकारने कॅनडाचे पीएम ट्रूडो यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रूडोचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. यानंतर भारताने नवी दिल्लीतील कॅनडाचे मुत्सद्दी कॅमेरून मॅके यांचीही हकालपट्टी केली.

Horoscope Today 20 September: मेष, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या करिअरबाबत सावध राहावे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

भारताने कॅनडाला प्रत्युत्तर दिले

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत सरकार कॅनडातील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. आम्ही आमच्या लोकशाही मूल्यांना बांधील आहोत. परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या दुता वासाला १५ दिवसांत देश सोडण्यास सांगितले होते. खलिस्तान टायगर फोर्स (KTF) प्रमुख आणि शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंह निज्जर यांची या वर्षी 18 जून रोजी गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस होते.

भारत-कॅनडा संबंध बिघडू शकतात

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडाचे जुने संबंध बिघडू शकतात. कॅनडाने भारतात राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. या सल्ल्यामध्ये त्यांनी आपल्या लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती कधीही बदलू शकते म्हणून सावध रहा. मीडियावर लक्ष ठेवा आणि दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. तसेच जम्मू काश्मीर भागात न जाण्याचे अपील कॅनडाने केले आहे. (Khalisthan)

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here