
देवळा : येथील जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि १६ रोजी चेअरमन भाऊसाहेब पगार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . संस्थेला पाच वर्ष पूर्ण झाली असून , या कालावधीत सभासद ,ठेवीदार यांच्या सहकार्याने संस्थेने अल्पावधीत प्रगती केली आहे .

संस्थेला सलग पाचव्यांदा लेखापरीक्षणाचा ” अ ” वर्ग प्राप्त झाला आहे . संस्थेच्या वतीने लवकरच विस्तारित शाखा सुरु करण्याचा मानस असल्याचे यावेळी यावेळी सांगण्यात आले . यावेळी सभासद पाल्य किरण प्रजापती हिची राज्य कर सहायक पदी निवड झाल्याबद्दल व संजू आहेर यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी संस्थापक चेअरमन जितेंद्र आहेर , व्हा चेअरमन लक्ष्मीकांत आहेर , मानद कार्यकारी संचालक नरेंद्र हिरे , संचालक समाधान आहेर , ऐशवन्त आहेर , सुनिल आहेर , पंकज सावकार , दावल भदाणे , अनिल आहेर , वसंत आढाव , विष्णू शेवाळे , सुलभा आहेर , भाग्यश्री पवार आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते . अहवाल वाचन व्यवस्थापक व्यवस्थापक दिलीप आहेर यांनी केले .आभार जितेंद्र आहेर यांनी मानले . सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले . सभा यश्वीतेसाठी दिलीप आहेर ,शुभम आहेर ,शरद खैरणार ,योगेश निकम ,दीपक आहेर आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम