
देवळा : मविप्र च्या येथील अभिनव व जनता विद्यालय शाळेत शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभिनव व जनता विद्यालय शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः विद्यार्थी शिक्षक बनून वर्गात जाऊन प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने या सर्व शिक्षकांचे स्वागत केले .प्रत्येक शिक्षकाचे वेळापत्रक एका विद्यार्थ्याला देऊन त्या विद्यार्थ्याने त्या शिक्षकांच्या तासिका घेऊन कामकाज केले .

शाळेत भाऊसाहेब , शिपाई, मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षिका या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनीच पार पाडल्या .
विद्यार्थ्यांनी सर्व शालेय शिक्षकांचा सत्कार केला विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्याला आज शिकवताना व अध्यापन करताना कोणते अनुभव आले याची प्रत्यक्ष माहिती कार्यक्रमात दिली. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व्हि डी अहिरे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले व शिक्षक समाजात किती महत्त्वाची भूमिका बजावतो हे पण विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका पूनम बाविस्कर ,धनश्री आहेर ,सुरेश आहेर, विशाल शेवाळे ,गणेश निकम, विनोद शेवाळे, किशोर पाटील ,महेश सूर्यवंशी, वृषाली देवरे ,शुभांगी बच्छाव ,मंजुषा सोनवणे ,शैला भामरे, योगिता भामरे उपस्थित होते .
शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून इयत्ता दहावीची विद्यार्थिनी पूर्वा पाटील यांनी कामकाज पाहिले . सूत्रसंचालन सोहम मराठे व दर्शन बहिरम यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम