नाशिक: शिवसंग्राम संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी आज हाती घड्याळ बांधले असून पुन्हा एकदा राजकारणात कमबॅक केले आहे. यामुळे चांदवड – देवळा मतदार संघात स्थानिक स्थरावर काही समीकरण बदलतात का याकडे बघणे महत्वाचे आहे. आहेर यांनी राजकारणातून गेल्या काही दिवसापासून एक्झीट घेतलेली होती मात्र पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून स्वगृही परतले आहेत. त्यांच्या सोबत राज्यभरातील शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत.

आहेर हे राजकारणाच्या सुरवातीपासून स्व. विनायकराव मेटे यांच्यासोबत राज्य पातळीवर कार्य करत होते मात्र त्यांना त्यांच्या स्थानिक स्थरावर हवे तसे यश येताना दिसत नव्हते त्यांची संघटना कुणाला पचनी पडत नव्हती. मात्र आता त्यांचा पक्ष प्रवेश कुणाला पचनी पडतो आणि पुन्हा संघटन उभे राहते का हे बघणे महत्वाचे असेल येणाऱ्या काळात त्यांना कुठली जबाबदारी दिली जाते याच्यावर देखील आहेर यांच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
आहेर यांनी पक्ष प्रवेश करतांना मराठा आरक्षण व मुंबईतील अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासह शेतकर्यांना 24 तास वीज, उत्तर महाराष्ट्रासाठी मांजरपाडा 2 ची योजना यासाठी पुढील काळात नियोजन करण्याचा शब्द घेवून शिवसंग्रामच्या राज्यभरातील 22 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसंग्राम युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याचे आहेर म्हणाले.
यावेळी अकोल्याचे माजी उपमहापौर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. शिवा मोहोड, नाशिकचे महापालिका अपक्षांचे गटनेते आणि नाशिक रोड प्रभाग समितीचे माजी सभापती श्री. शिवा भागवत, लातूर मनसे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर जगदाळे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री. शैलेश सरकटे, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष वैशालीताई जवंजाळ, बुलढाण्याचे पंजाबराव देशमुख, नंदुरबारचे संतोषराव मराठे, यासह लातूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कुलाबा मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, सोलापूर, नांदेड, परभणी, कोल्हापूर, या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवत माझ्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.
प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम