चंद्रयान-३ चा जल्लोष देवळ्यात

0
8
देवळा /येथे चंद्रयान-३ मोहिम यशस्वी केल्याबद्दल भारताच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतांना संभाजी आहेर,जितेंद्र आहेर ,अशोक आहेर ,हर्षद भामरे आदी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा ; चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवत भारताने पुन्हा एकदा इतिहास रचल्याबद्दल देवळा येथे सायंकाळी कार्यकर्त्यांनी पाच कंदीलवर फटाक्यांची आतषबाजी करीत इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ, सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे यावेळींअभिनंदन करण्यात आले.

 

देवळा येथे चंद्रयान ३ मोहिम यशस्वी केल्याबद्दल भारताच्या शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतांना संभाजी आहेरजितेंद्र आहेर अशोक आहेर हर्षद भामरे आदी छाया सोमनाथ जगताप

समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असून या निमित्ताने आपल्या देशाने विज्ञान क्षेत्रातील एका नव्या पर्वाकडे दमदार पाऊल टाकले आहे. भारताचे हे यश जागतिक पटलावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचा दबदबा वाढविणारे ठरणार आहे. या नव्या पर्वाचे स्वागत करूया असे यावेळी माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर म्हणाले .

यावेळी गटनेते संभाजी आहेर ,उपनगराध्यक्ष अशोक आहेर ,नगरसेवक करण आहेर ,कैलास पवार आदींसह प्रवीण मेधने ,कैलास पवार ,सरपंच चंद्रकांत आहेर ,मुन्ना आहेर ,डॉ अनिल चव्हाण ,हर्षद भामरे ,भूषण आहेर, देवा भामरे,चेतन आहेर ,माजी सरपंच रघु नवरे ,अनिल पगार आदी उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here