Keda aher bday: ‘थोडा संयम ठेवा, नवीन अध्याय सुरू होतोय……; नानांचा सूचक इशारा ?

0
31

Keda aher bday: देवळा तालुक्याचे राजकारण तुम्हा सर्वांना परिचित आहे. स्थानिक राजकारणात वेगवेगळे ट्विस्ट वेळोवेळी आले असून यात कींगमेकर हे केदा आहेर राहिले आहेत. नुकतेच आमदारकीचे स्वप्न नानांना पडू लागलेत अर्थात ते पडणे वाईट देखील नाही. जेव्हा राहुल आहेर आमदार झाले तेव्हा त्यांना मतदार संघात कुणीही ओळखत नव्हते तेव्हा लोकप्रियता केदा आहेर यांची होती. आणि तेच आमदार पदाचे उमेदवार असतील असे चित्र होते मात्र बाबांच्या आग्रहास्तव नानांना थांबावे लागले आणि बाकी काय घडले ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. अगदी मी आमदार पदाचा उमेदवार आहे असे समजून मतदान करा असे आवाहन केदा आहेर यांनी आपल्या भावासाठी करत त्यांना आमदार केले, कारण विद्यमान आमदार आहेर यांचे कार्य कर्तुत्व तेव्हा मात्र शून्य होते. बाबांचा पुत्र एवढच काय ती ओळख हे सर्व तालुक्याला माहित आहे. आज कदाचित आमदार महोदय हे नाकारतील मात्र ही सत्यता नाकारून चालणार नाही. दादांनी आज स्वतःला सिद्ध करत वेगळेपण जपले यात देखील काही शंका नाही. (Keda aher bday)

Mitra kit: विषारी कीटकनाशकाऐवजी मित्र कीट वापरा, तुम्हाला बंपर उत्पादन मिळेल

सध्या तालुक्यातील सर्व नेते एका छताखाली आले असून यात केदा आहेर हे नेतृत्व करत आहेत. याठिकाणी पक्ष वैगरे नसून नाना बोलतील तोच पक्ष सध्या तरी दिसत आहेत. देवळा तालुक्यात शिवस्मारक बनविण्यात देखील केदा आहेर यांचा पुढाकार अन् भूमिका महत्वाची ठरली कदाचित त्यांनी नेतृत्व केले नसते तर शिवस्मारक साकारणे स्वप्नच राहिले असते. असो विकास काम अथवा चांगल्या वाईट बाजू आपण टप्प्यात मांडू मात्र नानांना बनायचे आहे आमदार आणि ते करण्यासाठी त्यांनी तालुक्यात वाद शमवून एकत्रित सर्वांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांना एकत्रित आणण्यात तालुक्यात नानांना यश आले असेल तरी त्यांचे भाऊ आ. राहुल आहेर यावेळी नानांना उमेदवारी देण्यासाठी तयार होतील का हे बघणे महत्वाचे असेल कारण दादांना देखील मंत्री पदाचे स्वप्न पडले आहे. सोशल मीडियावर नानांना आमदार करण्यासाठी कार्यकर्ते सरसावले आहेत. मात्र तालुक्यात अनेक गावागावात नाराजीचा सुर देखील वाढत आहे. याच्या मागची कारणे मात्र अद्याप समजली नाही.

आमदारांना मानणारा वर्ग केदा आहेर यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काम करतोय अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे मात्र या चर्चेची पुष्टी ‘द पॉइंट नाऊ’ करत नाही. नाना – दादा यांच्यात संवाद चांगला असल्याचे चित्र सध्या बाहेर दिसत आहे. भविष्यात काय स्थिती असेल याकडे बघावे लागेल. मात्र तूर्तास आमदार पदासाठी दोघे भाऊ प्रबळ दावेदार आहेत हे देखील महत्वाचे आहे. राहिला चांदवड तालुक्याचा विषय तर त्या ठिकाणी देखील केदा आहेर यांनी संपर्क वाढवला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हालचालींना वेग येईल यात शंका नाही. मात्र या सर्व महत्वकांक्षी प्लॅनिंगवर बंधूंनी पाणी नको फिरवायला म्हणजे झाले.

नानांनी काहीवेळा पूर्वी आपली फेसबुक प्रोफाईल बदलली असून त्यात म्हटले आहे की’थोडा संयम ठेवा, नवीन अध्याय सुरू होतोय एका नवीन अंदाजात…!’ हे वाक्य बोलके अन् अनेक अर्थ निघणारी असले तरी निर्णय घेण्याची घाई नाना या वाढदिवसाला करतील असे वाटत नाही. आमदार व्हायचे असल्यास प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल हे नाना जाणून आहेत. आ. आहेर यांना मानणारा वर्ग वाढला आहे. पूर्वीसारखी परिस्थीती आता दिसत नाही. यामुळे नानांची चाल तिरकस जाते की सरळ वार होतात हे येणाऱ्या काळात दिसेलच. (Keda aher bday)

नानांचा नवीन अध्याय सुरू होतोय मात्र त्यांचे सल्लागार त्यांना बुचकळ्यात टाकताय असे चित्र दिसतेय, नाना भूमिका कोणती घ्यावी या संभ्रमात दिसत आहेत. वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होईल नाना काही मोठा निर्णय घेतील असे वातावरण केले, मात्र मध्येच दुष्काळाचे कारण देत वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले. त्यांनतर पुन्हा वाढदिवस तर साजरा होणारच म्हणून ट्रेण्ड चालवला याचाच अर्थ म्हणजे सल्लागार नानांना गोंधळात टाकताय यात शंका नाही..! आज नानांची पोस्ट द्वारे डरकाळी फोडली आहे. यात शिकार कुणाची होणार हे देखील बघावं लागेल. दादांनी तिकीट सोडायला नकार दिल्यास नानांच्या हाती घड्याळ येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अशी चर्चा आहे मात्र या चर्चेत कितपत तथ्य आहे हे नानाच जानो….


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here