नारपार प्रकल्पाच्या माध्यमातून परिसराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध ; आमदार डॉ राहुल आहेर

0
38
देवळा /रामेश्वर ता देवळा येथे व8विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार डॉ राहुल आहेर व्यासपीठावर केदा आहेर,योगेश आहेर,विलास देवरे ,प्रशांत देवरे ,विजय पगार आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : तालुका छोटा असला तरी येथे राजकिय प्रगल्भता चांगली आहे .विकास कामांसाठी सर्वजण राजकिय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येत असल्याने पुढील काळात रस्ते ,दळणवळण आदी सुविधांबरोबरच पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता नारपार प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत .असे प्रतिपादन आमदार डॉ राहुल आहेर यांनी आज येथे केले .

देवळा रामेश्वर ता देवळा येथे व8विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार डॉ राहुल आहेर व्यासपीठावर केदा आहेरयोगेश आहेरविलास देवरे प्रशांत देवरे विजय पगार आदी छाया सोमनाथ जगताप

रामेश्वर ता.देवळा येथील श्री क्षेत्र सहस्रलिंग मंदिरासाठी , पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या सभागृह, पार्किंग शेड, घाट, स्वच्छता गृह परिसर सुशोभीकरण आदी कामांसाठी मंजूर 2 कोटी 28 लक्ष रुपये किमतीच्या कामांचे भूमिपूजन रविवारी दि १३ रोजी आ. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर उपस्थित होते .

प्रास्ताविक मविप्र संचालक विजय पगार यांनी केले . यावेळी देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, माजी सभापती केदा आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी उमराणे बाजार समितीचे सभापती .प्रशांत देवरे, बापू देवरे,माजी सभापती विलास देवरे,उपसभापती मिलिंद शेवाळे ,खर्ड्याचे उपसरपंच सुनील जाधव , वाजगावचे माजी उपसरपंच बापू देवरे, प्रा डी के आहेर ,सचिन देवरे ,पुंडलिक महाराज ,कृष्णा जाधव आदींसह स्थानिक ग्रामस्थ सुखदेव महाराज पगार ,माणिक पगार ,आण्णा पगार ,नितीन पगार, उपसरपंच रघु पगार ,सरपंच केवळ गांगुर्डे, कारभारी पगार ,बाळासाहेब पगार ,बाबूलाल पगार, संजय पगार ,तुळशीराम मेधने, शाखा अभियंता जे बी शेवाळे ,ग्रामसेविका वैशाली येळीज आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गोविंद पगार यांनी केले तर आभार पोपट पगार यांनी मानले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here