Dhule Strike : मणिपूर येथे झालेल्या अमानुष घटनेच्या विरोधात आदिवासी दलित समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी व दलित समाज एकवटल्याचे दिसून आले. भगवान विर एकलव्य यांचा विजय असो, आदिवासी समाजाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आदी घोषणा नी शहराचा परिसर चांगलाच दणाणून गेला होता.(strike)
https://thepointnow.in/onion-rates/
या मोर्चाच्या माध्यमातून आरोपींना फाशी च्या शिक्षेसह इतर मागण्या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आल्या आहे. या मोर्चा करिता पोलीस प्रशासनाच्या वतीने मोर्चाच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिस्तबद्ध मोर्चातून एकतेचे दर्शन या निमित्ताने घडून आले. या मोर्चाला जील्हातील अनेक संघटनांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले होते(strike)
मोर्चातून केंद्र व मणिपूरमधील सत्ताधारी भाजपवर रोष
या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारसह मणिपूर राज्यातील भाजपा सरकार विरोधात मोर्चेकरांनी रोष व्यक्त करत निषेध नोंदवला. अडीच महिन्यांपासून होत असलेल्या आत्याचाराप्रसंगी केंद्र सरकार नेमकं काय करत होते ? असा संतप्त सवाल देखील या मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना करण्यात आला आहे.(strike)
असा होता मोर्चाचा मार्ग
मनिपुर येथील घटनेच्या विरोधात शहरातील फाशीफुल चौक येथुन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. फाशीपुल हुन निघालेला हा मोर्चा बस स्टँड मार्गे, आग्रा रोड, पाच कंदील, कराची वाला खुंट, मार्गे जुनी महानगरपालिका, क्यूमाइन क्लब येथे मोर्चाच्या आयोजकांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.(strike)
सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाण्याची सोय
धुळे शहरातून निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी वीरांगणा झलकारी बाई सामाजिक संस्थेच्या वतीने पाण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी अनेकांची तहान भागल्याने मोर्चेकरानी समाधान व्यक्त केले आहे.(strike)
या प्रसंगी ॲड. संतोष जाधव, अशोक धुळकर, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, पवन वाघ, महेंद्र माळी, संदीप मोरे, किशोर गायकवाड, नगरसेवक दिपक अहिरे, देवा सोनवणे, विजय मोरे, आबा अहिरे, रविंद्र मोरे, अजय पवार, राज माने , रविंद्र बोरसे, उमेश कढरे, राजकुमार सोनवणे, गीतांजली कोळी, बानूबाई शिरसाठ यांच्यासह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.(strike)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम