Breaking news : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत नुकतेच ते पुण्यातील कृषी विद्यापीठ परिसरात उतरले असून आता ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन या ठिकाणी महाआरती करून मग आपल्या पुढील दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मात्र पुण्यातील मंडई परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांकडून काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात येत आहे.
अनेक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे या ठिकाणी दाखल झाले आहेत. अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात येणार आहे. तर दिवसभर मोदी यांचा सहवास पुणेकरांना लाभणार आहे. यामुळे एकीकडे त्यांना बघण्यासाठी आणि त्यांच्या समर्थन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित झालेले असताना दुसरीकडे मात्र विविध सामाजिक संघटना आणि पक्षांनी एकत्र येत या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
https://thepointnow.in/prime-minister-modi-in-pune/
गो बॅक मोदी, जस्टीट्स मणिपूर यांचा विविध फलक हातांमध्ये घेऊन या आंदोलनकर्त्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. तर काळे झेंडे देखील अनेकांच्या हातात बघायला मिळत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बॅरिकेट्स लावून त्याच्या आतच या आंदोलकांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे.
आंदोलनात झळकले राष्ट्रवादीचे झेंडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध आणि निषेध म्हणून मंडई परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये विविध संघटनांनी एकत्र येत काळे कपडे आणि काळे झेंडे हातात घेऊन या आंदोलनाला सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधी या ठिकाणी दर्शवला जात आहे.
विविध राजकीय पक्षांसोबतच मात्र या ठिकाणी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचे झेंडे देखील बघायला मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये जरी दोन गट पडले असले तरी मात्र आजच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना दुसरीकडे मात्र आंदोलन स्थळी राष्ट्रवादीचे झेंडे बघायला मिळत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम