देवळा ; यापुढे शेतकऱ्यांना शेती निष्ठ मूल्यांचा विचार करून पुढे जावे लागणार असून, शासनाकडे पुढचे पन्नास साठ वर्ष कुठलेही धोरण नसून, यामुळे आपल्या परिसरात ना उद्योग धंदे येतील ना सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील . याची सांगड नसले तर आपल्या गावाचा विकास कधीच होणार नाही. हे समजून घेण्यासाठी प्रहारची नवीन टीम उभी करावी लागेल यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश निंबाळकर यांनी केले.
खर्डे ता देवळा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गणेश निंबाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी व चांदवड बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सत्कार सोहळ्यास प्रहारचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे ,विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव , ग्रामपंचायत माजी सदस्य गोकुळ जगताप , छत्रपती पतसंस्थेचे चेअरमन संदीप पवार , हंजराज जाधव , चांदवड तालुका अध्यक्ष गणेश तिडके , उपाध्यक्ष रेवण गांगुर्डे , गणेश नेरकर ,शशिकांत पवार , प्रगतिशील शेतकरी किसन देवरे , निंबा जगताप , माधव ठोंबरे , तुषार जाधव , मनोज सोनवणे ,रवींद्र चव्हाण , दीपक देवरे , पिनू गांगुर्डे , विलास देवरे , कैलास पगार , चेतन शेवाळे ,आबा गांगुर्डे , सुनील मोरे , हेमंत देवरे , अशोक गांगुर्डे , संजय जाधव , भास्कर गांगुर्डे , नाना गांगुर्डे ,बबलू गांगुर्डे आदी उपस्थित होते . प्रास्ताविक शशी ठाकरे यांनी केले तर आभार भाऊसाहेब मोरे यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम