देवळा : सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून , नवनवीन उपाययोजना शोधून प्रशिक्षित चोरांकडून फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी यासाठी सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले .
खर्डे ता देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (दि २८ )रोजी रस्ता सुरक्षा , महिला सुरक्षा व सायबर गुन्हेगारी या विषयावर आयोजित चर्चासत्रात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गर्शन करतांना सांगितले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रणधीर हे होते. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि , ग्रामीण भागातील विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा , यासाठी गावात अभ्यासिका असणे अत्यन्त गरजेचे आहे .
यासाठी आपण सहकार्य करण्यास तयार आहोत . विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे व मोबाईलचा वापर टाळावा . त्याच प्रमाणे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार व लैंगिक शोषण सारख्या घटना घडत असतात . यासाठी फोक्सो कडक कायदा असून , ग्रामीण भागात मुलींचे अल्पवयात पळून जाऊन लग्न लावण्याच्या घटना समोर येत आहेत . हा प्रकार करणे कायद्याने गुन्हा आहे . तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून , दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे व चार चाकी वाहनधारकांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले .
या कार्यक्रमास सरपंच जिभाऊ मोहन , उपसरपंच सुनील जाधव , प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव , पोलीस पाटील भारत जगताप , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल देवरे , आदींसह शिक्षक ,शिक्षकेत कर्मचारी , पोलीस ठाण्यातील कर्मचारी ज्योती गोसावी , बर्डे , शिरसाठ , मोरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रमुख मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक के आर चौरे यांनी केले . आबा आढाव यांनी आभार मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम