Political breaking : आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही ; मुख्यमंत्री अखेर बोलले

0
22

Political breaking : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. इर्शाळवाडी येथील दरड ग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला आहे. त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे. सिडकोद्वारे त्यांना घरे बांधून देणार आहोत. आम्ही रस्त्यावर उतरुन काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तसेच इर्शाळवाडीला दिखाव्यासाठी गेलो नव्हतो. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, माझी कुटूंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते हे सरकार काम करत नाही, असे शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांची मदत वाढवली आहे. आतापर्यंत १० कोटी रुपये वाटले आहे, असे शिंदे म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना आता केंद्राचे मिळून वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे.

पुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांना १० हजार रुपये मदत आपण देणार आहोत. या बरोबर टपरीवाल्यांना देखील ५० हजार रुपयाची मदत करण्यात येणार आहे, नुकसान जास्त असेल तर ७५ टक्के नुकसान देण्यात येणार. तसेच छोटी टपरी असेल तर १० हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

https://thepointnow.in/board-exam-update/

एक कोटी रुपयात आपण पीक विमा दिला आहे. शेवटचा शेतकरी यामध्ये येईल. दिड कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. कृषी सेवकांचे मानधन देखील वाढणार आहे. कृषी सेवकांचे मानधन ६ हजारावरुन १६ हजार करण्यात आले आहे.

अजित पवार सत्तेत आल्यामुळे सरकारला बुस्टर मिळाले आहे. सरकारला वेग आला आगे. हे मान्य करायला पाहिजे. महाविकास आघाडीने बंद पाडलेले कामं आम्ही सुरू केले, असे ही शिंदे म्हणाले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here