Cyclone threat to the state : गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक ठिकाणी महापूर आल्यानं हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल आहे. तर अनेकांचे संसार या पाण्यात वाहून गेले आहेत. असं असतानाच आता महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गावच्या गाव पाण्याखाली गेली आहेत. अनेक संसार वाहून गेले आहेत. तर कित्येक ठिकाणी पिकांची नासाडी देखील होत आहे. यातच आता बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याने हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याकडून हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर रायगड यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या रौद्ररूपामुळे मोठ्या अडचणींचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात झालेली दुर्घटना यात अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. यातच पुन्हा एकदा पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड यांसह आणखी काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई साठी सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://thepointnow.in/indian-women-went-to-pakistan-to-meet-her-facebook-friend/
मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, नांदेड, गडचिरोली या ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच आवाहन देखील हवामान खात्याने केल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम