देवळा : केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या सीसीआरटी शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण राज्यातून खर्डे ता देवळा येथील युवा कलावंत चांगदेव पुंडलिक देवरे याने घवघवीत यश संपादन केले आहे . केंद्र सरकारच्या वतीने युवा कलावंतासाठी विविध सांस्कृतिक क्षेत्रातील शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते . यात महाराष्ट्रातून नाशिक जिल्हयातील चांगदेव देवरे याची निवड झाली आहे .
विशेष म्हणजे संपूर्ण भारतातून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ,यात महाराष्ट्रातील दोन व एक बंगाल राज्यातील युवा कलावंतांचा समावेश आहे . या शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल घोषित झाला . या परीक्षेत चांगदेव देवरे याची महाराष्ट्रातून शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे . चांगदेव हा खर्डे येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरातील पुजारी ह भ प पुडलिक महाराज देवरे यांचा चिरंजीव असून ,तो गेल्या आठ वर्षांपासून आळंदी येथे प्रशिक्षण घेत आहे .
याठिकाणी त्याने पखवाज (मृदूंग) कला अल्पावधीत अवगत केल्याने , केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या युवा कलावंतासाठी विविध सांस्कृतिक क्षेत्रातील शिष्यवृत्ती परीक्षेत देवरे याने राज्यातून शिष्यवृत्ती मिळविण्याकामी यश मिळविले आहे . देवरे याच्या ह्या यशाबद्दल वारकरी परिवार तसेच ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम