देवळा : तालुक्यातील दहिवड येथे शनिवारी दि २२ रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने गाईचा फडशा पाडला असून , याठिकाणी बिबट्याच्या वाढत्या दहशतीने पशुपालकांत खबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे . जनावरांवर बिबटयाकडून सतत होणाऱ्या हल्य्यात अनेक जनावरे दगावली गेली आहेत .
वनविभागाने याची दखल घेऊन दहिवड व परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे . दहिवड ता देवळा येथील वाखारी रोड शिवारातील बापू तानाजी भारती यांच्या गट नंबर 513/बं/5/2 मधील शेतशिवारातील घरा जवळून शनिवारी दि २२ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने सत्तर ते ऐशी फूट ओढून नेत गाईचा फडशा पाडला. यामुळे पशुपालकांत घबराटीचे वातारण पसरले असुन याबाबत देवळा वन विभागाने दखल घ्यावी , अशी मागणी येथील प्रहारचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम