Sima haidar : पाकिस्थान हुन दिलेली सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीना या दोघांची उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरू होती. आणि ही चौकशी आता जवळपास पूर्ण होत आली आहे. एटीएस सोबतच केंद्रीय यंत्रणांनी ही या दोघांची चौकशी केली असल्याच समोर येतंय.
चौकशीच्या दरम्यान सीमा हैदर गुप्तहेर असल्याचे किंवा त्या संबंधित काही पुरावे आढळले नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता लवकरच एटीएस त्यांचा अहवाल गृह विभागाला पाठवणार आहे.
दरम्यान एटीएसच्या अहवाला नंतरच सीमा हैदर आणि तिच्या चारही मुलांना पाकिस्तानला पाठवायचं की नाही, याचा निर्णय गृह विभागातर्फे घेतला जाणार आहे. लखनऊचे एसएसपी अभिषेक सिंह यांच्या पथकाने ही चौकशी पूर्ण केली आहे. तसेच या दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी तिच्याकडून जप्त देखील करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी सीमा हैदरकडे कोणताही व्हिजा नव्हता. नेपाळमार्गे ती अवैधरित्या भारतामध्ये आली आहे. त्यामुळे सीमेवरील पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणतीही तपासणी न करता ती भारतात कशी आली? हे शोधण्यासाठी गुप्तचर संस्थेने सशस्त्र सीमा बल कडून अहवाल मागवला आहे. याचबरोबर युपी पोलिसांकडून देखील अहवाल मागवण्यात आला आहे.
सीमा उत्तर प्रदेशच्या सीमेवरून भारतात आली आणि ती बरेच दिवस आपल्या जोडीदारासोबत भारतात अवैधरित्या राहत होती.
उत्तर प्रदेश पोलीस विभागाचे विशेष डीजी प्रशांत कुमार यांनी सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांशी संबंधित माहिती दिली आहे. सीमाकडे दोन व्हिडीओ कॅसेट, चार मोबाईल फोन आणि पाच पाकिस्तानी अधिकृत पासपोर्ट मिळाले असून एटीएसकडून हे जप्त करण्यात आलं आहे. यातील एक पासपोर्ट वर आधार क्रमांक आणि नाव नसल्याने या पासपोर्ट प्रकरणाचीही चौकशी सुरु आहे.
दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदर आणि सचिन मीना हे PUBG गेमच्या माध्यमातून २०२० मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले त्यानंतर १५ दिवसांतच या दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. दोघांमध्ये व्हाट्सऍप वरुन बोलणं सुरु झाल होती.
१० मार्च २०२३ ला पाकिस्तान मधील कराची एअरपोर्टवरुन सीमा हैदर ही शारजाहला आली. त्यानंतर ती नेपाळच्या काठमांडू विमानतळावर पोहचली व १५ दिवसाच्या टुरिस्ट व्हिजावर ती निघाली होती. यानंतर १७ मार्चला नेपाळ मार्गेच ती पुन्हा कराचीला गेली.
दरम्यान ग्रेटर नोएडामध्ये राहणारा तिचा प्रियकर सचिन मीना हा ८ मार्च २०२३ ला परी चौक गौतमबुद्धनगर या ठिकाणाहून गोरखपूरला पोहोचला व नंतर काठमांडू या ठिकाणी गेला. १० मार्चच्या तो काठमांडूला पोहचला. यानंतर सीमा आणि सचिन न्यू विनायक हॉटेलच्या एका रुममध्ये एकत्र राहिले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम