Breaking : जयंत पाटलांची आसनव्यवस्था सत्ताधारी बाकावर

0
47

Maharashtra Breaking : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रवादी उभी फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होत आहे. आता सभागृहात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील आमदार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे.

त्यातच आता राष्ट्रवादीचे नवे प्रतोद आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचे आदेश जारी केले आहे. त्यामुळं राष्ट्रवादीतील कोणत्या गटात किती आमदार आहेत, याचा खुलासा पावसाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

त्यातच जयंत पाटील यांची आसनव्यवस्था मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाजूला अर्थातच सत्ताधारी बाकावर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विधीमंडळात जितेंद्र आव्हाड यांची नवे प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. आता जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे.

तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी देखील राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. आता कुणाचा व्हीप लागू होणार?, आणि कुणाला कायदेशीर धक्का बसणार?, याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे

सोबतच आज कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत? हेदेखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यासह पक्षातील ९ आमदारांवर व्हीप जारी केला आहे. तसेच या आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून अपात्रतेची नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादीतील फूटीवर काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांवरील प्रलंबित अपात्रतेच्या कारवाईवरही राहुल नार्वेकर पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here