Wardha Crime : लग्नाला नकार देताच आरोपीने तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे.
Jalgaon : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादात,वादग्रस्त धार्मिक स्थळावर प्रवेशबंदी
लग्नाला नकार दिल्याने एमपीएससी पास झालेल्या दर्शना पवारची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता वर्ध्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असताना लग्नाला नकार दिल्याने आरोपीने थेट आपल्याच प्रेयसीवरच जीवघेणा हल्ला केला आहे. कौस्तूभ सेलवते असं आरोपीचं नाव असून वर्धा शहरातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
पीडित तरुणीने गेल्या एक वर्षांपासून आरोपीशी ब्रेकअप केलं होतं. तरीदेखील आरोपीने लग्नाचा हट्ट धरत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. रामनगर मधील धक्कादायक घटनेने वर्धा शहरात खळबळ उडाली आहे.
Breaking News: सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे निधन
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरात राहणारा आरोपी कौस्तूभ सेलवते हा गेल्या तीन वर्षांपासून परिसरातील एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून कौस्तूभने प्रेयसीकडे लग्नाची मागणी करायला सुरुवात केली होती. मात्र पीडित तरुणीने कौस्तुभशी दूर राहण्यास सुरुवात केली. परंतु तरीही आरोपी कौस्तुभ ऐकण्यास तयार नव्हता. रविवारी पीडिता दुकानात जात असताना आरोपी कौस्तुभने तिचा पाठलाग करत तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केलं. तसेच कौस्तुभने हल्ला केल्याचं समजताच तरुणीने थेट घराच्या दिशेने धाव घेतली. तसेच तरुणीने आरडाओरड केल्याने स्थानिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला.
आरोपीने धावत्या तरुणीच्या अंगावर एसिड सदृश द्रवरूप पदार्थ फेकला, त्यामुळं पीडितेचा मानेवरील काही भाग जळाला आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आरोपी कौस्तुभ सेलवटे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सेलवटे याला तरुणीवर हल्ला करण्यात त्याच्या एका मित्रानेही साथ दिली आहे, पोलिसांकडून आणखी एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम