Crime दोनशे रुपयांसाठी शस्त्राचा धाक दाखवून पुणे शहर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता गँगला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सध्या हिंसाचाराचा घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या सदाशिव पेठ या ठिकाणी एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुणे शहर परिसरात दहशत माजवण्यासाठी सोबत कोयता बाळगणारी गँग ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी केज बीड रोडवरील जोला सासुरा पाटीवरील राणा डोईफोडे यांच्या रेणू पेट्रोल पंपावर एडवोकेट प्रदीप इतापे हे आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना त्या ठिकाणी तीन अनोळखी तरुणांनी त्यांना लातूर कडे जाण्याचा रस्ता विचारला आणि त्यांच्याशी बाचाबाची केली. याबाबत एडवोकेट इतापे यांनी केज पोलिसांना माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडून धारदार कोयते आणि मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. यशवंत कुमार (उत्तम लोधी सोमेश्वर वाडी सावरकर पार्क पुणे) गणेश एकनाथ मनाळे (जवान शेख भट्टी बालाजी चौक पुणे) आणि विशाल राजाभाऊ कांबळे (एकनाथ नगर पाषाण पुणे) अशी या तिघा अटक करणे आलेल्यांची नावे आहेत.
ती कोयता गॅंगच…
पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी यशवंत कुमार लोधी, गणेश एकनाथ मनाले आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी त्यांनी पुणे एलसीबी सोबत संपर्क साधला. यावेळी ही कोयता गॅंग असून त्यांनी पुणे शहर आणि परिसरात धारदार शस्त्र आणि कोयत्याचा धाक दाखवत अनेक गुन्हे केले असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणी यशवंत कुमार लोधी, गणेश एकनाथ मनाले आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांच्या विरुद्ध गुरुवारी केज पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस करत आहेत.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असताना गुन्हेगारांकडे धारदार शस्त्र असताना देखील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक शमीम पाशा आणि पोलीस नाईक नितीन जाधव यांनी धाडस दाखववुन या गुन्हेगारांना जेरबंद केल्याने त्यांच्या या धाडसा बद्दल त्यांचं सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह पोलीस प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे
तर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीवर पुणे शहरवासीयांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम