Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच महामार्गावर खाजगी बसचा अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर आणखी एका खाजगी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या बसला पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि या अपघातात बसमधील जवळपास वीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर जवळ असलेल्या सांगवी परिसरात ही दुर्घटना घडली. ट्रकने बसला पाठीमागून धडक दिल्याने सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाहीये.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार खुराणा ट्रॅव्हल्स ची ही बस होती प्रवाशांना घेऊन ही बस जात असताना समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजी नगर शहराजवळ असलेल्या सांगवी परिसरात लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला बसने पाठीमागून धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात बसच्या पुढील बाजूचा पूर्णतः चक्काचुर झाला आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी मात्र बसमधील वीस प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. अपघातात जखमी झालेल्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे तरी यातील किरकोळ जखमी अकरा प्रवाशांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम