pimpri Chinchwad : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातुन एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका लेडीज टेलरने १० वर्षाच्या मुलीसोबत गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. या टेलरने या चिमुरडीचे तिचे फोटो काढले. ही घटना पोलिसांना कळताच त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Monsoon Update: इगतपुरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी तालुक्यातील धरणाच्या पाणसाठ्यात वाढ
पिंपरी चिंचवड येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एका लेडीज टेलरने १० वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करुन तिचे नग्न फोटो काढले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांनी टेलरला चांगलाच मार देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शनिवारी रात्री हा धक्कादायक प्रकार सांगवी येथील मेहक लेडीज टेलर या दुकानात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनवर मोहरम शहा (वय २८) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी येथे ‘मेहक लेडीज टेलर’ नावाचे दुकान आहे. या ठिकाणी आरोपी सनवर मोहरम शहा हा कामाला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही या दुकानात तिचा फ्रॉक शिवण्यासाठी आली होती. फ्रॉक शिवून झाल्यानंतर आरोपी सणवरने तिच्या घरच्यांना फ्रॉक शिवून झाल्याचं सांगत पीडित मुलीला पाठवून देण्यास सांगितले. मुलगी दुकानात आली असता फ्रॉकच माप व्यवस्थित आहे का? नाही हे पाण्यासाठी त्याने मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिच्याशी अश्लील चाळे केले. येवढेच नाही तर तिचे नग्न अवस्थेत फोटो देखील काढले.
Mehboob Pansare : मेहबूब पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी गजाआड, काय आहे राष्ट्रवादी कनेक्शन?
दरम्यान हा प्रकार मुलीने घरी गेल्यावर तिच्या आईला सांगितला. या नंतर संतप्त पालकांनी दुकानाच्या समोर गोंधळ घातला. ही बाब आजूबाजूच्या नागरिकांना, दुकानदारांना समजताच नागरिकांनी आरोपी सनवरला दुकानाच्या बाहेर काढत चांगलाच चोप दिला. ही बाब पोलिसांना कळल्यावर सांगवी पोलिसांनी घटनास्थळी येत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. दरम्यान या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम