Solapur Breaking : सोलापुरात MIDC मधील अरिहंत टेक्स्टाईलमध्ये काम करणाऱ्या मुनाकुमार रामधार सिंह या बिहारी तरुणाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तिघांनी मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. जुना कुंभारी नाका परिसरातील हॉटेल बी प्रकाश बारसमोर ही घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी (ता. ८) एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकजण फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
Kerala : मेंदू खाणार्या अमिबामुळे होणारा मृत्यू, किती धोकादायक आहे हा आजार?
एमआयडीसीतील फॅक्टरीत काम करणाऱ्या मुनाकुमार रामाधार सिंह (वय ४४) याची हत्या; करणाऱ्या संशयित तिघा आरोपीविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा- अरिहंत टेक्स्टाईल इंडिस्ट्रीज, लोकमंगल हॉस्पिटलजवळ, एमआयडीसी येथे तो मृत तरूण राहायला होता- जुना कुंभारी नाका परिसरातील हॉटेलमध्ये दारू प्यायला गेल्यावर तिघांनी त्याला जबर मारहाण केली- मयताचा येथे कोणीच नातेवाईक नसल्याने अरिहंत टेक्स्टाईलच्या मॅनेजर यांनी दिली पोलिसांत फिर्याद- गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू; तिघांवर खुनाचा गुन्हा- खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांची घटनास्थळी भेट- एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी नित्यानंद परमेला (वय २९) व सागर महेश पवार (वय २३) या दोघांना अटक केली असून आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. खुनाच्या गुन्ह्यातील दिगंबर विटकर हा संशयित फरार झाला असून त्याचा शोध पोलिस करीत असून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्यामार्फत गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम